रोडरोमिओ पथकासाठी नवे निर्देश

By admin | Published: April 27, 2017 01:06 AM2017-04-27T01:06:26+5:302017-04-27T01:06:26+5:30

सडक सख्याहारीविरोधी पथकाने ‘काय करावे आणि काय करू नये’ याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना नव्याने दिशानिर्देश देत कायदा

New instructions for the Roadromyo squad | रोडरोमिओ पथकासाठी नवे निर्देश

रोडरोमिओ पथकासाठी नवे निर्देश

Next

लखनौ : सडक सख्याहारीविरोधी पथकाने ‘काय करावे आणि काय करू नये’ याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना नव्याने दिशानिर्देश देत कायदा हाती घेऊन गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा वा अराजक निर्माण करणाऱ्या गोरक्षकांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश देत उत्तर प्रदेशचे नवीन पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी सर्व प्रकारच्या एफआयआर नोंदविण्याबाबत चालढकल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्धही कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत जिल्हास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले, असे पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. सर्व अधिकाऱ्यांनी सकाळी कार्यालयात येऊन जनतेच्या समस्यांचे निराकरण करावे. पोलीस कारवाईदरम्यान कोणालाही अपमानित करू नये. सर्वांशी नम्रतेने वागावे. कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवले जावे, तसेच वाहतूक ठप्प होईल, अशा निदर्शनास मुभा दिली जाऊ नये.

Web Title: New instructions for the Roadromyo squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.