इस्रो’ची नवी झेप

By Admin | Published: December 19, 2014 04:19 AM2014-12-19T04:19:21+5:302014-12-19T05:20:53+5:30

‘जीएसएलव्ही मार्क-३’ या देशी बनावटीच्या आजवरच्या सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपक अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण करून त्यासोबत सोडलेल्या

A new leap of ISRO | इस्रो’ची नवी झेप

इस्रो’ची नवी झेप

googlenewsNext

श्रीहरीकोटा : ह्यजीएसएलव्ही मार्क-३ ह्या देशी बनावटीच्या आजवरच्या सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपक अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण करून त्यासोबत सोडलेल्या ह्यक्रु मॉड्युलह्णच्या पृथ्वीच्या वातावरणात पुनर्प्रवेशाची अवघड कामगिरीही फत्ते करत अंतराळवीर अवकाशात पाठविण्याची भारताची महत्वाकांक्षा फलद्रुप करण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) गुरुवारी पहिले पाऊल टाकले. ह्यमंगळयानाह्णच्या यशापाठोपाठ साध्य केलेल्या या यशाने गुंतागुंतीचे व प्रगत अंतराळ तंत्रज्ञान स्वबळावर विकसित करणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताचे स्थान पुन्हा एकदा पक्के झाले. आताचे तंत्रज्ञान भविष्यात अधिक परिष्कृत करून पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात झेपावायला आणखी काही वर्षे लागतीलही. पण त्याआधी ह्यइन्सॅटह्ण मालिकेतील अधिक मोठे दळणवळण उपग्रह सोडण्यासाठी परदेशी प्रक्षेपक संस्थांवर अवलंबून न राहण्याची आत्मनिर्भरता नक्की साध्य होईल. येथील सतीश धवन अंतराळ तळाच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून ठीक सकाळी ९.३० वाजता ह्यजीएसएलव्ही मार्क-३ह्ण हा अग्निबाण अंतराळात झेपावला. त्याच्या डोक्यावर ह्य क्रु मॉड्युल अ‍ॅटमॉस्फिरिक रिएन्ट्री एक्परिमेंटह्ण (केअर) हे मॉड्युल बसविलेले होते. भविष्यात अंतराळवीर अंतराळात पाठविण्यासाठी वापरायच्या यानातील महत्त्वाच्या टप्प्याची ही जणू लघुरूप प्रतिकृती होती. अंतराळवीरांना अंतराळात पाठवून तेथील कामगिरी उरकल्यावर त्यांना पुन्हा सुखरूपपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी लागणाऱ्या प्रगत आणि गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाचे सैद्धांतिक धडे गुरुवारच्या प्रयोगाने गिरविले गेले. पुढील दोन वर्षांत आणखी चाचण्या घेऊन या अग्निबाणाने प्रत्यक्ष उपग्रह सोडणे शक्य होईल, अशी आशा आहे, असे इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन म्हणाले. उपग्रह प्रक्षेपक अग्निबाणाची चाचणी यशस्वी केल्याबद्दल लोकसभेने इस्रोच्या वैज्ञानिक व अभियंत्यांना शाबासकी दिली. (वृत्तसंस्था)

शक्तिशाली अग्निबाणाचे उड्डाण

> ‘जीएसएलव्ही मार्क-३’ या देशी बनावटीच्या सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपक अग्निबाणाचे भारताने यशस्वी उड्डाण केले. तसेच ‘क्रु मॉड्युल’च्या पुनर्प्रवेशाची अवघड कामगिरीही फत्ते करून दाखविली.

> 04 टन व त्याहून अधिक वजनाचा दळणवळण उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्याची क्षमता सिद्घ झाली.

> अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यासाठी अंतराळात पाठविलेले यान पृथ्वीवर सुखरूपपणे परत आणण्याचे बिनचूक तंत्रज्ञान आत्मसात करणे हा अपरिहार्य भाग असतो.

> याच दिशेने छोटेसे पहिले पाऊल म्हणून गुरुवारी जीएसएलव्ही मार्क-३ अग्निबाणासोबत ‘क्रु मॉड्युल अ‍ॅटमॉस्फिरिक रिएन्ट्री एक्सपरिमेंट’ (केअर) हे मॉड्युल सोडण्यात आले होते.

> कप केकच्या आकाराचे हे मॉड्युल २.७ मीटर उंचीचे, ३.१ मीटर व्यासाचे व तीन टनांहून अधिक वजनाचे होते.    

> जीएसएलव्ही मार्क-३ चे यशस्वी प्रक्षेपण ही आपल्या वैज्ञानिकांच्या बुद्धिसामर्थ्याची व कठोर मेहनतीची पुनश्च दिली गेलेली ग्वाही आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान (टिष्ट्वटरवरून)

Web Title: A new leap of ISRO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.