५०० आणि २००० च्या नव्या नोटा अधिक सुरक्षित

By admin | Published: November 9, 2016 04:49 AM2016-11-09T04:49:32+5:302016-11-09T04:49:32+5:30

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने नव्या व अतिशय उच्च सुरक्षिततेच्या ५०० आणि दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटांचे उत्पादन केले असून

New notes of 500 and 2000 are more secure | ५०० आणि २००० च्या नव्या नोटा अधिक सुरक्षित

५०० आणि २००० च्या नव्या नोटा अधिक सुरक्षित

Next

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने नव्या व अतिशय उच्च सुरक्षिततेच्या ५०० आणि दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटांचे उत्पादन केले असून त्या चलनातून बाहेर काढून घेण्यात आलेल्या नोटांची जागा घेतील.
बनावट भारतीय चलनाचे वाढते प्रमाण व त्याचा वापर दहशतवाद पोसण्यासाठी होत असल्यामुळे रिझर्व्ह बँक आणि सरकार चिंतेत होते. अनेक कायदा राबविणाऱ्या यंत्रणांना काळा पैसा दहशतवाद वाढविण्यासाठी वापर होत असल्याचे समजत होते. त्यामुळे ५०० आणि एक हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा सरकारचा निर्णय काळ््या पैशाच्या संकटाला तोंड देण्यासाठी धाडसी होता.
५०० आणि एक हजार रुपयांची नोट बाद करण्याबरोबरच १० नोव्हेंबर २०१६ पासून रिझर्व्ह बँक नव्या नोटा चलनात आणणार आहे. उर्जित पटेल म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने नव्या व अतिशय उच्च सुरक्षिततेच्या ५०० आणि दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटांचे उत्पादन केले असून त्या चलनातून बाहेर काढून घेण्यात येणाऱ्या नोटांची जागा घेतील.
सध्या ५०० रुपयांच्या १६.५ अब्ज तर एक हजार रुपयांच्या ६.७ अब्ज नोटा चलनात आहेत. सरकारने एका दिवसासाठी एटीएमवरून खात्यातील दोन हजार रुपये तर बँकेत जाऊन जास्तीत-जास्त दहा हजार रुपये तर आठवड्यात २० हजार रुपये काढण्याचे बंधन घातले आहे. पैसे काढण्याची मर्यादा हळुहळु वाढविली जाईल कारण छोट्या मूल्यांच्या चलनाचा साठा बँकांमध्ये आणि एटीएमवर असून नव्या चलनी नोटा चलनात येतील. एक हजार रुपयांची चलनी नोट लवकरच पुन्हा उपलब्ध केली जाईल, असे दास म्हणाले. दोन हजार रुपयांच्या नोटेचा चलनातील समावेशावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल व रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण त्यावर असेल, असेही त्यांनी सांगितले.
९ नोव्हेंबरला बँकांना सुटी आहे आणि कोषागारेही बंद असतील. २०११ ते २०१६ दरम्यान ५०० रुपयांच्या नोटा ७६ टक्क्यांनी तर एक हजार रुपयांचे चलन १०९ टक्क्यांनी वाढले परंतु अर्थव्यवस्था केवळ ३० टक्क्यांनी वाढली. बेकायदा चलन बदलून घेण्यासाठी तुमचा वापर होणार नाही, याची काळजी घ्या. तुमचे मित्र आणि कुटुंबातील नातेवाईकांसाठी मात्र हे काम तुम्ही करू शकता. एक हजार रुपयाच्या नोटेसह इतर रकमांच्या नोटाही चलनात आणल्या जातील. हे पाऊस का उचलावे लागले याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात पुरेसा खुलासा केला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रामाणिकपणासाठी व तुम्हाला अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने वाढ हवी असेल तर ही बनावट अर्थव्यवस्था आधी बंद झाली पाहिजे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: New notes of 500 and 2000 are more secure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.