फेसबुक अॅपवर नवा पर्याय 'सी फर्स्ट'

By Admin | Published: July 28, 2015 06:03 PM2015-07-28T18:03:01+5:302015-07-28T18:03:59+5:30

फेसबुकच्या अॅपवर तुम्हाला न्यूज फिडमध्ये कोणाचे पोस्ट पहिले दिसले पाहिजे हे ठरवता येणार आहे.

A new option for the Facebook app 'Sea First' | फेसबुक अॅपवर नवा पर्याय 'सी फर्स्ट'

फेसबुक अॅपवर नवा पर्याय 'सी फर्स्ट'

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २८ - फेसबुकवर दररोज हजारो पोस्ट पडत असताना या अनावश्यक पोस्ट बघणं हे तापदायक असतं. पण आता फेसबुकने यावरही उतारा शोधला असून फेसबुकच्या अॅपवर तुम्हाला न्यूज फिडमध्ये कोणाचे पोस्ट पहिले दिसले पाहिजे हे ठरवता येणार आहे. सध्या ही सुविधा आयफोन ग्राहकांसाठी असली तरी लवकरच अँड्रोईड ग्राहकांनाही ही सुविधा दिली जाणार आहे. 
फेसबुकवर दर तासाला १० कोटी फोटो अपलोड होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले होते. यावरुन फेसबुकवरील पोस्टचे प्रमाण किती असेल हे लक्षात येते. फेसबुकवरील या लाखो पोस्टमधील आपल्या कामाची पोस्ट शोधण म्हणजे त्रासदायकच. पण फेसबुकने आता यावर उपाय शोधला आहे. फेसबुकने काही दिवसांपूर्वी iOS युजर्ससाठी 'सी फर्स्ट' ही सुविधा दिली आहे. आयफोन ग्राहकांनी फेसबुक अॅपवर मोअरमध्ये जायचे. यानंतर 'न्यूज फिड प्रिफरन्सेस'वर क्लिक करुन आवश्यक व्यक्तींची निवड करायची. यानंतर तुम्हाला अॅपमध्ये तुम्ही निवडलेल्या व्यक्तींचे पोस्ट पहिले दिसेल. 
 

Web Title: A new option for the Facebook app 'Sea First'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.