नव्या संसदेत मंत्र्यांसाठी दालनांचे वाटप; जाणून घ्या कोण-कुठे बसणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 09:27 AM2023-09-16T09:27:12+5:302023-09-16T09:27:50+5:30
संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्र्यांसाठी नव्या संसदेत दालनं देण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या नवीन संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट मंत्र्यांना दालनांचे वाटप करण्यात आले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्र्यांसाठी नव्या संसदेत दालनं देण्यात आली आहेत. या वाटपात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांना तळमजल्यावर दालनं देण्यात आली आहेत.
यादरम्यान गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मुंडा, इराणी स्मृती, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव यांना दालनं देण्यात आली आहेत. .
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, गिरीराज सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, पशुपती कुमार पारस, गजेंद्र सिंह शेखावत किरेन रिजिजू, आरके सिंह आदींनाही दालनं देण्यात आली आहेत.
आधी होती 'ही' व्यवस्था
विद्यमान संसद भवनातही ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांना तळमजल्यावर दालनं देण्यात आली होती. दरम्यान, संसदेच्या विशेष सत्रादरम्यान नवीन मोदी सरकारचे मंत्री आपापल्या दालनात शिफ्ट होतील आणि तेथून त्यांच्या मंत्रालयाचे काम करतील. दरम्यान, 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी 17 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता सर्व पक्षांच्या सभागृह नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.