New Parliament : 'जेव्हा लोक विचारतील आम्ही काय बांधले…; संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी मजूर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 09:25 AM2023-05-28T09:25:19+5:302023-05-28T09:25:55+5:30
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी पूजा आणि मंत्रोच्चारानंतर लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल स्थापित करण्यात आला.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात पूजेने झाली. या पूजेला पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी इमारतीच्या बांधकामासाठी काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार केला.
मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवीन आधुनिक संसदेची इमारत प्रत्यक्षात आणण्यासाठी हजारो मजूर दोन वर्षांहून अधिक काळ अथक परिश्रम करत आहेत. ६०,००० कामगार आणि पर्यवेक्षक इमारत ऑन-साइट आणि ऑफ-साइट तयार करण्यासाठी काम करत आहेत.
उद्घाटनाच्या एक दिवस आधी शनिवारी संपूर्ण संकुल बंद ठेवण्यात आले होते. बूम बॅरिअरमधून फक्त विशेष स्क्रीनिंग केलेल्या कार, व्हीआयपी, सुरक्षा कर्मचारी, पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांना आत प्रवेश देण्यात आला. लोखंडी गेट ८ वर बॅरिकेड्स लावण्यात आले ज्यातून मजूर ये-जा करत होते.
या कामासाठी मध्यप्रदेशमधीलही काही मजूर होते. यातील मजूर सांगतात, गेल्या काही वर्षांपासून दिवसाचे १२ तास काम करतो आणि महिन्याला सुमारे १७,००० रुपये कमावतो. “काम जवळपास ९९ टक्के पूर्ण झाले आहे. आम्ही दोन शिफ्टमध्ये २४×७ काम केले आहे. कोरोमा महामारीच्या काळातही आम्ही थांबलो नाही.” फेब्रुवारी २०२१ मध्ये आलेल्या एका फोन कॉलपासून याची सुरुवात झाल्याचे त्यांनी आठवण सांगितली.
बिहारमधील २४ वर्षीय कामगार इम्रान सांगतात की, इमारतीच्या काही भागात मचान तयार करण्याचे काम अजूनही सुरू आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागतील. “हे काम खूप अवघड होते, पण जर लोकांनी आम्हाला विचारले की आम्ही काय केले, तर आम्ही म्हणू शकतो की आम्ही संसद भवन बांधले, तेही दोन वर्षांत. आपण आपल्या डोळ्यांसमोर संपूर्ण इमारत बांधलेली पाहिली आहे.