नवीन संसद भवनात काय आहे विशेष? जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 03:44 PM2023-05-25T15:44:31+5:302023-05-25T15:50:13+5:30

उद्धाटनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नवीन संसदेबद्दल लोकांची उत्सुकता वाढत आहे.

new parliament how different will it from the old parliament | नवीन संसद भवनात काय आहे विशेष? जाणून घ्या, सविस्तर...

नवीन संसद भवनात काय आहे विशेष? जाणून घ्या, सविस्तर...

googlenewsNext

नवी दिल्ली : येत्या 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, उद्धाटनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नवीन संसदेबद्दल लोकांची उत्सुकता वाढत आहे. नवीन संसद भवनात काय विशेष असेल? असे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. नवीन संसद दिसायला सुंदर तर आहेच, पण सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप मजबूत आहे. खासदारांच्या आसन व्यवस्थेबरोबरच येथील ग्रंथालय, विश्रामगृह आणि चेंबर्सही आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहेत. 

नव्या संसदेत आणखी काय विशेष असणार आहे, हे 10 मुद्द्याद्वारे जाणून घ्या...

1) नवीन संसद भवनाची इमारत 4 मजली आहे, ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक बनवण्यात आली आहे. संसद भवनाच्या परिसरातील हिरवळ हे त्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे.

2) नवीन संसद भवनामध्ये 1272 सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, म्हणजेच लोकसभेच्या 888 जागा आणि राज्यसभेच्या 384 जागा आहेत. तर जुन्या संसदेत लोकसभेच्या केवळ 550 आणि राज्यसभेच्या 250 जागा होत्या.

3) व्हिस्टा प्रकल्प 2019 मध्ये सुरू झाला. या अंतर्गत एक नवीन संसद भवन बांधली, जी 65400 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामावर जवळपास 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

4) नवीन संसद भवनमध्ये लोकसभा आणि राज्यसभेसह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज मोठा सेंट्रल हॉल, ग्रंथालय आणि समिती खोल्या आहेत. याठिकाणी जे मार्शल तैनात असतील त्यांना नवीन ड्रेस असणार आहे.

5) सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संसद भवनात लोकसभेची थीम राष्ट्रीय पक्षी मोरावर तर राज्यसभेची थीम राष्ट्रीय फूल कमळावर आहे.

6) संसद भवनाच्या तीन दरवाजांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार असे नाव देण्यात आले आहे. येथे सेंट्रल लाउंज देखील बांधण्यात आले आहे, ज्याच्या खुल्या भागात वटवृक्ष देखील असणार आहे.

7) नवीन संसद भवनातील लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या विविधतेचे प्रतीक असलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या खिडक्या असणार आहेत.

8) नवीन संसदेची इमारत जगातील सर्वात खास असणार आहे. संसदेची डिझाईन करण्यापूर्वी टीमने जर्मनी, इजिप्त, क्युबा आणि सिंगापूरच्या संसदेला भेट दिली होती, जी जगातील सर्वात खास असल्याचे म्हटले जाते.

9) नव्या संसदेत सर्व खासदारांना लिहिण्यासाठी एक डेस्क असणार आहे. आतापर्यंत ही व्यवस्था फक्त पुढच्या रांगेत बसणाऱ्या खासदारांसाठी होती.

10) नवीन संसद भवनात स्पीकरच्या आसनाजवळ सेंगोल (राजदंड) ठेवला जाईल, जुन्या संसदेत ही व्यवस्था नव्हती. आतापर्यंत सेंगोल अलाहाबाद संग्रहालयात होता.

Web Title: new parliament how different will it from the old parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.