मुलायमसिंहांचा भाऊ उत्तरप्रदेशात काढणार नवीन पक्ष
By admin | Published: January 31, 2017 03:16 PM2017-01-31T15:16:26+5:302017-01-31T15:16:26+5:30
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षावर वर्चस्व मिळवले असले तरी, समाजवादी पक्षातील अंतर्गत यादवी अद्याप संपलेली नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 31 - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षावर वर्चस्व मिळवले असले तरी, समाजवादी पक्षातील अंतर्गत यादवी अद्याप संपलेली नाही. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा असंतोष उफाळून येऊ शकतो. पक्षांतर्गत यादवीला कारण ठरलेले मुलायमसिंह यांचे बंधु शिवपाल यांनी स्वत: तसे संकेत दिले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समर्थकांसमोर बोलताना शिवपाल यांनी 11 मार्चला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपण नवीन पक्ष स्थापन करु असे त्यांनी सांगितले. कालपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये अनेक अडथळे होते. पण आज समाजवादी पक्षाच्या तिकीटावर मी अर्ज दाखल केला असे त्यांनी सांगितले.
आज मी जे काही आहे ते नेताजींमुळे आहे. अनेकजण म्हणतात ते जे काही आहेत ते नेताजींमुळे आहेत. पण त्यांनीच नेताजींना अपमानित केले अशा शब्दात त्यांनी नाव न घेता अखिलेश यादववर टीका केली. पक्षांतर्गतच आपल्याला दगाफटका होऊ शकतो त्यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता असे ते म्हणाले.
Hum jaante hain ki Samajwadi Party mein bhi 'bheetar-ghaat' karne wale log hain, unse savdhaan rehne ki zarurat hai: Shivpal Yadav in Etawah pic.twitter.com/5mR6aNSwIH
— ANI UP (@ANINewsUP) 31 January 2017