अवघ्या ३ दिवसांत Passport घरपोच, नियमांमध्ये बदल; वेबसाइटवर जाऊन हा नवा फॉर्म भरा की काम झालं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 06:26 PM2022-08-06T18:26:01+5:302022-08-06T18:26:47+5:30

जर तुम्ही पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण सरकारनं पासपोर्ट सेवेत काही बदल केले आहेत.

New Passport Apply May Get In Just 3 Days Fill This Form Online | अवघ्या ३ दिवसांत Passport घरपोच, नियमांमध्ये बदल; वेबसाइटवर जाऊन हा नवा फॉर्म भरा की काम झालं!

अवघ्या ३ दिवसांत Passport घरपोच, नियमांमध्ये बदल; वेबसाइटवर जाऊन हा नवा फॉर्म भरा की काम झालं!

Next

नवी दिल्ली-

जर तुम्ही पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण सरकारनं पासपोर्ट सेवेत काही बदल केले आहेत. हे बदल पहिल्यांदाच केलेले नाहीत. पासपोर्ट सेवा काळानुसार बदलत असते. यावेळीही असेच बदल करण्यात आले असून लोकांना लवकरच पासपोर्ट मिळणं सोपं होणार आहे. ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला फक्त एक पर्याय निवडावा लागणार आहे. 

पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. तिथं तुम्ही सहज पासपोर्टसाठी अर्ज करू शकणार आहात. पासपोर्ट अर्ज करण्यासाठी तुम्ही फॉर्म उघडता तेव्हा तुमच्या समोर अनेक पर्याय दिसतील. यामध्ये तुम्हाला तत्काळ पासपोर्टचा पर्याय (Tatkaal Passport Option) निवडावा लागेल. आता सरकारनं तत्काळ पासपोर्टच्या वेळेतही बदल केला आहे.

तत्काळ अर्ज केल्यानंतर 3 दिवसात घरपोच पासपोर्ट
आता तुम्हाला Tatkaal Passport  मिळवण्यासाठी फक्त ३ दिवस वाट पाहावी लागेल. तत्काळ पासपोर्ट ३ दिवसात तुमच्या घरी पोहोचेल. तसेच, त्याचे पोलिस व्हेरिफिकेशनही अतिशय वेगानं केलं जातं. ऑनलाइन उपलब्ध माहितीनुसार, हा पासपोर्ट १५ दिवसांत पाठवला जातो. आता पोस्टानं पत्त्यावर पोहोचण्यासाठी सामान्य वेळ लागू शकतो. पण त्याची काळजी करण्याची गरज नाही.

ऑनलाइन फॉर्म भरून अर्ज करू शकता-
Passport Apply करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट (https://portal2.passportindia.gov.in/AppOnlineProject/user/RegistrationBaseAction) येथे भेट देऊ शकता. तुमच्याकडून ऑनलाइन पासपोर्टसाठी शुल्क आकारलं जाईल. Fresh Passport साठी Normal Fees 1,500 रुपए इतकी आहे. तर ६० पानांच्या पासपोर्टसाठी तुम्हाला २ हजार रुपये आकारले जातील. नॉर्मल पासपोर्टसाठी ३० दिवसांचा वेळ लागतो. 

Web Title: New Passport Apply May Get In Just 3 Days Fill This Form Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.