IRCTC वरून तिकीट काढताना पेमेंटचा नवा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 01:21 PM2018-08-17T13:21:10+5:302018-08-17T13:21:14+5:30

प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा आयआरसीटीसी आणि फोनपे यांच्या भागिदारीने सुरू होत आहे.

A new payment option for withdrawing tickets from IRCTC | IRCTC वरून तिकीट काढताना पेमेंटचा नवा पर्याय

IRCTC वरून तिकीट काढताना पेमेंटचा नवा पर्याय

Next

नवी दिल्ली - प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा आयआरसीटीसी आणि फोनपे यांच्या भागिदारीने सुरू होत आहे. रेल्वे प्रवाशांना 'रेल कनेक्ट अँड्रॉईड अॅप'वरुन ही सेवा उपलब्ध होत असून याद्वारे लवकरात लवकर तिकिटाचे डिजिटल बुकिंग करता येईल. विशेष म्हणजे सहजपणे रेल्वेच्या प्रवाशांना हे तिकीट बुकिंग करता येईल, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.

फोन पे कंपनीने गुरुवारी आयआरटीसीसोबत यासंदर्भात करार केला आहे. डिजिटल पेमेंटचा वापर कर्त्यांसाठी ही सुविधा वरदान असल्याचे Phone Pay ने म्हटले आहे. या भागिदारीमुळे Phone Pay युजर्स युपीआय, क्रेडिट आणि डेबिट कार्डऐवजी फोन पे वॉलेटद्वारे तिकिटाचे बुकिंग करु शकणार आहेत. तर, फोन पे द्वारे थेट युजर्सच्या बँक अकाऊंटवरुनही या सुविधेसाठी पैसे जमा केले जाऊ शकतात. या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना तिकिट बुकींगसाठी आणखी एक पर्याय मिळाला आहे. तर डिजिटल इंडियामध्ये भारतीय रेल्वेचा हिरिरीने सहभाग होत आहे, या दोन बाबी या भागिदारीमुळे शक्य झाल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी आयआरसीटीसीने ई-वॉलेट सेवा सुरु केली आहे. ज्याद्वारे रेल कनेक्ट अॅपच्या सहाय्याने तत्काळ तिकीटाचे बुकिंग करता येऊ शकते. 
 

Web Title: A new payment option for withdrawing tickets from IRCTC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.