पंतप्रधान निवासस्थान-कार्यालयाचे स्थलांतर होणार; नवीन संसद भवन 2022 पर्यंत उभारण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:39 AM2020-01-16T10:39:59+5:302020-01-16T10:58:33+5:30

या प्रोजेक्टसाठी गुजरातमधील ऑर्किटेक्चर फर्मला 229.75 कोटी रूपये दिले जाणार आहेत.

New PM house, PMO & Parliament before 2024; ministries along central vista | पंतप्रधान निवासस्थान-कार्यालयाचे स्थलांतर होणार; नवीन संसद भवन 2022 पर्यंत उभारण्याचे लक्ष्य

पंतप्रधान निवासस्थान-कार्यालयाचे स्थलांतर होणार; नवीन संसद भवन 2022 पर्यंत उभारण्याचे लक्ष्य

googlenewsNext

नवी दिल्ली : पंतप्रधान निवासस्थान आणि कार्यालय दिल्लीतील साऊथ ब्लॉकजवळ हलविण्याची शक्यता आहे. यासोबत उपराष्ट्रपती यांचे नवीन निवासस्थान नॉर्थ ब्लॉकजवळ होण्याची शक्यता आहे. सेंट्रल विस्टा रिडेव्हलोपमेंट प्रोजक्टनुसार, उपराष्ट्रपती निवासस्थानासह लुटियंस दिल्लीतील काही इमारती तोडण्यात येणार आहेत.

सेंट्रल विस्टा रिडेव्हलोपमेंट प्रोजेक्टमध्ये (central vista redevelopment project) सध्या संसद भवनाजवळ नवीन त्रिकोणीय संसद भवन, कॉमन केंद्रीय सचिवालय आणि तीन किलोमीटर लांबीच्या राजपथचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टशी संबंधीत सुत्रांनी सांगितले की, "उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासस्थान अनुक्रमे नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकजवळ शिफ्ट करण्याची योजना तयार करण्यात येत आहे. यामुळे परिसरातील ट्रॅफिक कमी होणास मदत होईल. कारण, व्हीव्हीआयपी मुव्हमेंटमुळे सतत लुटियंसमध्ये लोकांना त्रास सहन करावा लागत आहे." 

पंतप्रधान निवासस्थान आणि कार्यालय जवळच असणार आहे. कारण, पंतप्रधान निवासस्थानापासून कार्यालयात चालत जाऊ शकतील. यासोबत नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकला दोन संग्रहालयांमध्ये बदलण्याची योजना आहे. नवीन संसद भवनात 900 ते 12000 खासदार बसण्याची क्षमता असणार आहे, असेही या सुत्रांकडून समजते. 

याचबरोबर, नवीन संसद भवनात आरामदायक सीटसह प्रत्येक सीटवर कम्प्युटर स्क्रीन असणार आहे. यासोबत केंद्रीय मंत्री आणि खासदारांचे कार्यालय असणार आहे. त्रिकोणीय संसद भवन 2020 पर्यंत बांधण्याचे लक्ष्य आहे. तर, 2024 पर्यंत कॉमन केंद्रीय सचिवालय उभारण्याची शक्यता आहे. 

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सेंट्रल विस्टा रिडेव्हलोपमेंट प्रोजेक्टच्या वास्तुकला आणि इंजिनीअरिंग प्लॉनिंगचे कॉन्ट्रक्ट गुजरातमधील ऑर्किटेक्चर फर्म एचसीपी डिझाइन्सला दिले आहे. यासाठी या फर्मला 229.75 कोटी रूपये दिले जाणार आहे. या फर्मची जिम्मेदारी प्रोजेक्टचे मास्टर परियोजना तयार करण्याची आहे. यामध्ये डिझाइन, अंदाजे खर्च, लँडस्केप आणि ट्रॅफिक इंटिग्रेसन प्लॅन व पार्गिंकची सुविधा यांचा समावेश आहे.  

महत्त्वाच्या बातम्या 

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांचं निलंबन

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

36 केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार, सरकारच्या योजनांची माहिती देणार

'अच्छे दिन' येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे 'बरे दिन' तरी आणा; महागाईवरुन शिवसेनेचा टोला

दिल्लीत उघडली सिंचन घोटाळ्याची फाईल!; अजित पवार अडचणीत येणार?

काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरूच; धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द

Web Title: New PM house, PMO & Parliament before 2024; ministries along central vista

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.