लोकसभा निवडणुकीपूर्वी घेणार नवी मतदान यंत्रे

By admin | Published: April 3, 2017 05:00 AM2017-04-03T05:00:42+5:302017-04-03T06:07:26+5:30

बहुजन समाज पार्टीने मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर गडबड केली गेल्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अधिक सुरक्षित अशी नवी मतदान यंत्रे घेण्याची तयारी सुरू केली

New polling machines will be held before Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीपूर्वी घेणार नवी मतदान यंत्रे

लोकसभा निवडणुकीपूर्वी घेणार नवी मतदान यंत्रे

Next


नवी दिल्ली : पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभांच्या ताज्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या अनुक्रमे आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर गडबड केली गेल्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अधिक सुरक्षित अशी नवी मतदान यंत्रे घेण्याची तयारी सुरू केली आहे.
सध्या वापरात असलेली मतदानयंत्रे सन २००६ पूर्वीची असून त्यांचे १५ वर्षांचे ‘आयुष्य’ संपत आल्याने अशी सर्व बदलण्यासाठी ९ लाख ३० हजार ४३० नवी यंत्रे खरेदी करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. या यंत्रांची खरेदी येत्या वर्षभरात पूर्ण होईल आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी ती उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.
सूत्रांनुसार खरेदी केली जाणारी नवी यंत्रे ‘एम३’ या प्रकारची अत्याधुनिक यंत्रे असतील व यंत्रात कोणी गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास ते आपोआप बंद पडण्याची त्यांत व्यवस्था असेल. या यंत्रांमध्ये त्यांचा असलीपणा ओळखण्याची अंगभूत यंत्रणा असेल. अणू ऊर्जा खात्याच्या अखत्यारितील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया व संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी बनविलेल्या यंत्रांमध्येच अशी यंत्रणा असते व फक्त अशीच यंत्रे पर्स्परांशी जोडली जाऊ शकतात. त्यामुळे जी यंत्रे बनावट असतील ती आपोआपच ओळखली जाऊ शकतील.
या नव्या यंत्रांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या डिसेंबरमध्ये निवडणूक आयोगाला १,००९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.एकूण अपेक्षित कर्च १,९४० कोटी रुपये आहे. या दोन कंपन्यांची उत्पादन क्षमता व पूर्वीचा अनुभव विचारात घेऊन प्रत्यक्षात घेण्याच्या यंत्रांच्या संख्येत कमी-अधिक बदल करण्याची मुभाही मंत्रिमंडळाने आयोगास दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>९२00 कोटी मंजूर
याआधी निवडणूक आयोगाने १४ लाख नवी मतदान यंत्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव
दिला होता.
त्यासाठी लागणाऱ्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून ९,२०० कोटी रुपये गेल्या जुलैमध्ये मंजूर केले गेले होते. गेल्या तीन वित्तीय वर्षांत आयोगाने नवी यंत्रे खरेदी केलेली नाहीत.

Web Title: New polling machines will be held before Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.