रेल्वेत खाण्यापिण्याचे नवे दर, 7 रूपयात कॉफी तर 50 मध्ये जेवण
By admin | Published: February 27, 2017 09:29 PM2017-02-27T21:29:41+5:302017-02-27T21:29:41+5:30
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी नेहमी खाण्यापिण्याच्या वस्तूंची मनाप्रमाणे किंमत वसूल केल्याची तक्रार करतात.आयआरसीटीसीने खाण्या-पिण्याचे नवे अधिकृत दर जारी केले
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी नेहमी खाण्यापिण्याच्या वस्तूंची मनाप्रमाणे किंमत वसूल केल्याची तक्रार करतात. अनेकदा प्रवाशांना खाण्या-पिण्याच्या वस्तुंचे नेमके दर माहितच नसतात आणि त्यांची फसवणूक होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेची नवी कॅटरींग पॉलिसी जारी केली आहे.
नव्या पॉलिसीद्वारे आयआरसीटीसीला देशातील सर्व ट्रेनमधील खाण्यापिण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सर्व झोनल रेल्वेमधील पॅन्ट्री सर्विसचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
नवे दर मेल आणि एक्सप्रेससाठी आहेत. राजधानी, शताब्दी, दुरंतो यासारख्या अन्य लक्झरी ट्रेनमधील दर वेगळे आहेत हे आयआरसीटीसीने स्पष्ट केलं आहे. मात्र, सध्या ज्या ट्रेनच्या कॅटरींगचा करार दुस-या कंपन्यांसोबत झाला आहे तो करार संपल्यानंतर त्याची जबाबदारीही आयआरसीटीसीकडे येईल. आयआरसीटीसीने ट्विट करून खाण्या-पिण्याचे नवे अधिकृत दर जारी केले आहेत.
कशे आहेत नवे दर-
चहा किंवा कॉफी- 7 रूपये
पाणी बॉटल- 15 रूपये
शाकाहारी ब्रेकफास्ट-30 रूपये
मांसाहारी ब्रेकफास्ट- 35 रूपये
शाकाहारी थाळी- 50 रूपये (पाणी बॉटल सोबत)
मांसाहारी थाळी- 55 रूपये (पाणी बॉटल सोबत)
Dear Passengers, Know Your Entitlement @RailMinIndiapic.twitter.com/aeqeqWd6Xh
— IRCTC (@IRCTC_Ltd) February 15, 2017