समाधानकारक पावसाच्या भाकितानंतर सेन्सेक्सचा नवा विक्रम
By admin | Published: May 10, 2017 11:43 AM2017-05-10T11:43:50+5:302017-05-10T11:54:15+5:30
भारतीय हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर शेअर बाजारात उत्साह संचारला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - भारतीय हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर शेअर बाजारात उत्साह संचारला आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 264 अंकांनी वधारुन 30,197 अंकांवर पोहोचला. आतापर्यंतची सेन्सेक्सची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सेन्सेक्सने उसळी घेतल्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सुद्धा 73 अंकांची वाढ होऊन निफ्टी 9390 अंकांवर जाऊन पोहोचला.
यंदा मान्सून सामान्य राहील, 100 टक्के पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तवला. हवामान खात्याने गेल्या १८ एप्रिल रोजी नैर्ऋत्य मान्सूनच्या पावसाचा प्राथमिक अंदाज जाहीर करताना यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असे म्हटले होते. त्यामुळे अनेकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती.
पुरेशा पावसामुळे ग्रामीण भागाबरोबर अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याने शेअर बाजारात उत्साह आहे. यापूर्वी 27 एप्रिलला सेन्सेक्सने 30,184 अंकांची उंची गाठली होती.