'लवकरच एका नवीन धर्माची स्थापना होणार', इमाम इलियासी यांचा दावा, नावही सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:56 IST2025-04-04T14:55:53+5:302025-04-04T14:56:16+5:30
New Religion: तीन धर्म एकत्र येण्याचा दावाही डॉ. इमाम उमैर इलियासी यांनी केला आहे.

'लवकरच एका नवीन धर्माची स्थापना होणार', इमाम इलियासी यांचा दावा, नावही सांगितले...
New Religion: भारतातील चर्चित इमाम डॉ. उमेर इलियासी यांनी एक मोठा दावा केला आहे. लवकरच एक नवीन धर्माची स्थापना होईल, हा धर्म मुस्लिम, ज्यू आणि ख्रिश्चनांना एकत्र करेल. या तिन्ही धर्माचे मूळ एकच आहे, पण आता ते आपापसात भांडतात. हा संघर्ष संपवण्यासाठी जगभरात तयारी सुरू आहे, असे इलियासी यांनी म्हटले आहे. तसेच, यासाठी अबुधाबीमध्ये एक केंद्रही स्थापन झाल्याची माहिती त्यांनी दिली.
कोणता धर्म स्थापन होणार?
डॉ. इलियासी पुढे म्हणतात की, या नवीन धर्माचे नाव इब्राहिम एक विश्वास, असे असेल. येत्या काळात हा धर्म येईल, त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे मूळ एकच आहे, पूर्वज एकच आहे. या तिघांना एकत्र येण्याचा एकच मार्ग आहे आणि त्यांना एकत्र करण्यासाठी हा इब्राहिम धर्म येणार आहे. तो कधी येईल, कसा येईल माहीत नाही, पण येणार नक्की.
हे मत नाही, सत्य आहे. अबू धाबीमध्ये एक केंद्र बांधले गेले आहे, त्याचे नाव इब्राहमिक फेथ सेंटर आहे. ती तिन्ही धर्मांसाठी हे केंद्र बनवले आहे. इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मात उपासनेच्या पद्धती नक्कीच भिन्न आहेत, परंतु ते सर्व समान आहेत. तिन्ही धर्मांना एकत्र आणण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत आणि ते नक्कीच एकत्र येतील. इब्राहमिक धर्म संपूर्ण जगामध्ये या सर्वांना एकत्र करेल, असा दावाही त्यांनी केला.