जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यास नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 04:09 AM2020-11-26T04:09:44+5:302020-11-26T04:10:17+5:30

आधी लावावे लागेल शून्य : २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक होतील उपलब्ध

New rules for talking on mobile from landline from January | जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यास नवा नियम

जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यास नवा नियम

Next

नवी  दिल्ली : येत्या एक जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्याच्या नियमांत मोठा बदल करण्यात येणार आहे. यानुसार देशभरात लँडलाइनवरून मोबाइलवर काॅल करण्यासाठी ग्राहकांना एक जानेवारीपासून मोबाइल नंबरच्या आधी शून्य (०) लावावे लागणार आहे. दूरसंचार विभागाने ट्रायच्या या निर्णयाला मान्यता दिली आहे. ट्रायने या प्रकारच्या कॉलसाठी मोबाईल क्रमांकाआधी शून्य लावण्याची शिफारस २९ मे २०२० रोजी केली होती. या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांना अधिक क्रमांक देणे सोयीस्कर होणार आहे.

दूरसंचार विभागाने २० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकात म्हटले की, लँडलाइनवरून मोबाइलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या ट्रायच्या शिफारशीला मान्यता देण्यात आली आहे. यामुळ‌े मोबाइल आणि लँडलाइन सेवांसाठी पुरेशा प्रमाणात नंबर देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या परिपत्रकातील उल्लेखानुसार हा नियम लागू करण्यात आल्यानंतर लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी मोबाइल क्रमांकाच्या आधी शून्य जोडावे लागेल. दूरसंचार विभागाने सांगितले की, दूरसंचार कंपन्यांना लँडलाइनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायल करण्याची सुविधा द्यावी लागेल. सध्या ही सुविधा आपल्या क्षेत्राबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. फिक्स लाइन स्वीचमध्ये उपयुक्त घोषणा कराव्यात, ज्यामुळे फिक्स लाइन सबस्क्रायबर्सना सर्व फिक्स्डमधून मोबाईल कॉलच्या पुढे 0 डायल करण्याच्या आवश्यकतेबाबत सांगता येईल, असेही या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

जानेवारीपर्यंतचा दिला अवधी
दूरसंचार कंपन्यांना या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी १ जानेवारीपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. डायल करण्याच्या पद्धतीत अशा प्रकारच्या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाइल सेवेसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करील.

 

Web Title: New rules for talking on mobile from landline from January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.