काय सांगता! भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींचा फोटो अंतराळात पाठवणार

By देवेश फडके | Published: February 15, 2021 11:05 AM2021-02-15T11:05:18+5:302021-02-15T11:08:16+5:30

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी भगवद्गीतेची (Bhagavad Gita) एक प्रत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो आणि २५ हजार भारतीय लोकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहे.

new satellite will carry bhagavad gita and pm narendra modi photo in space | काय सांगता! भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींचा फोटो अंतराळात पाठवणार

काय सांगता! भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींचा फोटो अंतराळात पाठवणार

Next
ठळक मुद्देभगवद्गीता आणि मोदींचा फोटो अंतराळात पाठवणारपहिला खासगी उपग्रह अंतराळात झेपावणारपीएसएलव्ही सी-५१ दोन खासगी उपग्रहांसोबत सएडी सॅट अवकाशात सोडणार

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्था (इस्रो) सर्वाधिक विश्वसनीय असलेल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाने म्हणजेच पीएसएलव्ही सी-५१ ने इतर दोन खासगी उपग्रहांसोबत सएडी सॅट अवकाशात सोडणार आहे. विशेष म्हणजे यावेळी भगवद्गीतेची एक प्रत, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा फोटो आणि २५ हजार भारतीय लोकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहे. (new satellite will carry Bhagavad Gita and PM Narendra Modi photo in space)

खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह सतीश धवन सॅटलाइटसोबत (सएडी सॅट) फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अंतराळात सोडण्यात येणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाकडून यापूर्वी अनेकदा अशा प्रकारे लोकप्रिय व्यक्तींच्या नावांची यादी अंतराळात पाठवण्यात आली आहे. हा ट्रेण्ड आता भारताकडूनही फॉलो केला जात आहे. 

भिवंडीतील शेतकऱ्याने खरेदी केले हेलिकॉप्टर, दुधाच्या व्यवसायासाठी घेतले ‘वाहन’

बहुतांश नावे विद्यार्थ्यांची

भगवद्गीता आणि  पंतप्रधाननरेंद्र मोदींचा फोटो (PM Narendra Modi) यासह पाठवल्या जाणाऱ्या २५ हजार नावांमध्ये बहुतांशी नावे ही विद्यार्थ्यांची असतील, असे सांगितले जात आहे. स्पेसकिड्स इंडियाच्या संस्थापिका आणि कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. केसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाच्या प्रक्षेपणासंदर्भात खूप उत्साह असल्याची माहिती दिली. अंतराळात जाणारा हा आमच्या कंपनीचा पाहिला उपग्रह असणार आहे. अमेरिकेतील अंतराळ मोहिमांप्रमाणे या मोहिमेमध्ये भगवद्गीतेची प्रत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि फोटोही या उपग्रहाच्या पुढील पॅनलवर आत्मनिर्भर मोहिमेसोबत जोडून लावण्यात आला आहे. हा उपग्रह पूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे.

खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह 

खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह सतीश धवन सॅटलाइटसोबत अंतराळात सोडण्यात येणार आहे. एसडी सॅटची निर्मिती करणाऱ्या चेन्नईमधील स्पेसकिड्स या कंपनीने तांत्रिक विभागाचे प्रमुख रिफत शाहरुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, साडेतीन किलो वजनाच्या या नॅनो उपग्रहामध्ये एक अतिरिक्त चिप लावण्यात आली असून, त्यामध्येच ही नावे असणार आहे. या नॅनोसॅटेलाइटचे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक असणाऱ्या सतीश धवन यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाची गोडी वाढावी या हेतूने हा उपग्रह अंतराळात पाठवण्यात येणार असल्याचे स्पेसकिड्सकडून सांगण्यात आले. 

Web Title: new satellite will carry bhagavad gita and pm narendra modi photo in space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.