नव्या ‘स्टिंग’मुळे रावत अडचणीत

By admin | Published: May 9, 2016 03:17 AM2016-05-09T03:17:27+5:302016-05-09T03:17:27+5:30

पदच्युत मुख्यमंत्री हरीश रावत १० मे रोजी उत्तराखंडच्या विशेष अधिवेशनात शक्तिपरीक्षेला सामोरे जात असताना, नव्या स्टिंग आॅपरेशनमुळे अडचणीत सापडले आहेत.

The new 'sting' turns into trouble | नव्या ‘स्टिंग’मुळे रावत अडचणीत

नव्या ‘स्टिंग’मुळे रावत अडचणीत

Next

डेहराडून : पदच्युत मुख्यमंत्री हरीश रावत १० मे रोजी उत्तराखंडच्या विशेष अधिवेशनात शक्तिपरीक्षेला सामोरे जात असताना, नव्या स्टिंग आॅपरेशनमुळे अडचणीत सापडले आहेत. आमदारांना पैशाचे आमिष दाखविले जात असल्यासंबंधी नवा व्हिडीओ जारी करीत, भाजपाने खळबळ उडवून दिली. रावत यांनीही काँग्रेसच्या आमदारांना धमक्या देत विविध मार्गाने छळ केला जात असल्याचा आणि केंद्रीय संस्थांकडून त्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप करीत प्रत्युत्तर दिले आहे.
बंडखोर आमदार हरकसिंग रावत आणि काँग्रेसचे आमदार मदनसिंग बिश्त यांच्यातील संवाद रविवारी एका टीव्ही वाहिनीने जारी करीत, नवे राजकीय वादळ उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर हरीश रावत यांनी केंद्र सरकार आणि भाजपने ब्लॅकमेल करण्याचे राजकारण चालविल्याचा आरोप केला.
आमच्या आमदारांना वाटप केलेल्या खाणींमधून मिळालेला पैसा रावत यांनी आमदारांना देऊ केला असून, त्यांना सत्ता स्वत:कडे ठेवायची आहे, असे बिश्त म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले. रावत यांनी स्वत:च्या आमदारांना शांत करण्यासाठी २५ ते ३० लाख रुपये देऊ केले आहेत, असे काँग्रेसचे आमदार सांगत असल्याचे नव्या स्टिंग व्हिडीओवरून स्पष्ट होते. रावत स्वत: घोडेबाजारात गुंतले असल्याचे व्हिडीओवरून दिसून येते, असे भाजपाचे नेते भगतसिंग कोशियारी यांनी दिल्लीत पत्रपरिषदेत सांगितले. यापूर्वी रावत यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना परत पक्षात आणण्यासाठी सौदेबाजी चालविल्याचा व्हिडीओ जारी करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: The new 'sting' turns into trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.