Corona Virus : कोरोनाचा कहर! देशातील 7 राज्यांत वेगाने पसरतोय नवा व्हेरिएंट JN.1; 'या' ठिकाणी सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:42 PM2023-12-27T12:42:09+5:302023-12-27T12:49:31+5:30

Corona Virus : कोरोनासोबतच त्याचा नवीन सब व्हेरिएंट JN.1 देखील वेगाने पसरत आहे. देशातील संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात 83 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

new sub variant of corona virus is spreading rapidly in country know which state is most affected | Corona Virus : कोरोनाचा कहर! देशातील 7 राज्यांत वेगाने पसरतोय नवा व्हेरिएंट JN.1; 'या' ठिकाणी सर्वाधिक रुग्ण

Corona Virus : कोरोनाचा कहर! देशातील 7 राज्यांत वेगाने पसरतोय नवा व्हेरिएंट JN.1; 'या' ठिकाणी सर्वाधिक रुग्ण

कोरोनासोबतच त्याचा नवीन सब व्हेरिएंट JN.1 देखील वेगाने पसरत आहे. देशातील संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात 83 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. JN.1 चा सर्वाधिक प्रभाव गुजरातमध्ये दिसून आला आहे. गुजरातशिवाय गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये देखील अनेक रुग्ण आढळले आहेत. केरळला कोरोनाचा फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 4,170 संक्रमित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत, ज्यांची संख्या 3,096 आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत गुजरातमध्ये 34, कर्नाटकात 8, तामिळनाडूमध्ये 4, गोव्यात 18 आणि महाराष्ट्रात 7 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये कोरोनाचे 122 रुग्ण आढळून आले आहेत, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एका 51 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या महिलेला आधीच अनेक आजार होते. महिलेला श्वास घेण्यासही त्रास होत होता. यासोबतच किडनी आणि शरीराचे इतर अवयवही काम करणे बंद झाले होते. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गुजरातमध्ये कोरोनाचा कहर

नवीन व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणं गुजरातमध्ये दिसून येत आहेत. त्यामागील कारण म्हणजे तेथे कोरोना चाचणीत वाढ करण्यात आली आहे. केरळमध्ये कोविड-19 सतत वाढत असताना, आत्तापर्यंत JN.1 चे 5 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. INSACOG डेटानुसार, नवीन सब व्हेरिएंट JN.1 च्या प्रकरणांमध्ये डिसेंबर महिन्यात वाढ झाली आहे. 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, 29 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. देशात नवीन व्हेरिएंटच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे.

JN.1 व्हेरिएंटपासून असा करा बचाव

- नवीन व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. 
- वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवा. 
- बाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका. 
- कोरोनाची लक्षणं कोणत्याही व्यक्तीमध्ये दिसल्यास, त्यांच्या संपर्कात येणे टाळा.
- आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
 

Web Title: new sub variant of corona virus is spreading rapidly in country know which state is most affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.