कोरोनाची नवीन लक्षणे ? ही लक्षणे का आढळतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:32 AM2021-09-08T06:32:37+5:302021-09-08T06:32:56+5:30
नव्या कोरोनाबाधितांमध्ये ही लक्षणे आढळून येण्याची दाट शक्यता असून त्यांना स्टेरॉइड्सचे उपचार देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.
लोकमत न्यूज नेटवर्क :
कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंट्सची उत्पत्ती जगभरात होत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या लक्षणांमध्येही बदल होत आहेत. आता कोरोनाची नवीन लक्षणे समोर आली आहेत. म्हणजे घसा खवखवणे, वास-चव या जाणिवा नाहिशा होणे ही लक्षणे आता मागे पडली आहेत.
ही लक्षणे का आढळतात
ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या कानातील पेशींना सूज येते. त्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते.
कोरोनाबाधितांच्या ऐकण्याच्या क्षमतेत घट झाल्याचे सध्यातरी निदर्शनास आलेले नाही. मात्र, ही संख्या वाढू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
नव्या कोरोनाबाधितांमध्ये ही लक्षणे आढळून येण्याची दाट शक्यता असून त्यांना स्टेरॉइड्सचे उपचार देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.
n देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३१,२२२ रुग्ण आढळले तर २९० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू ४,४१,०४२ झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले.
n एकूण बाधितांच्या संख्येत मृत्यूचे प्रमाण १.३३ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३,९२,८६४ आहे.
n देशात २० लाख रुग्ण ७ ऑगस्ट, २०२० रोजी, ३० लाख २३ ऑगस्ट रोजी, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख , १६ सप्टेंबर रोजी ५० लाख होते.
दुसऱ्या लाटेतली लक्षणे काय होती ?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटने कहर केला होता.
यादरम्यान अतिसार, मळमळणे आणि उलट्या होणे ही लक्षणे प्रामुख्याने निदर्शनास आली होती.
ताप येणे. त्यात
चढ-उतार होणे ही कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे होती.
कोरोनाची बाधा असल्याचे आढळले तर शरीराचे तापमान, श्वासोच्छवासाचा दर, रक्तदाब, प्राणवायूची पातळी आणि रक्तातील साखर या सगळ्यांचे गणन केले जाणे गरजेचे आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस व इतर प्रकारच्या वैद्यकीय गुंतागुंत टळतात, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
खबरदारी काय?
नवीन लक्षणांपैकी काहीही आढळले तरी तातडीने कोरोना चाचणी करून घेणे इष्ट, असे तज्ज्ञांचे मत आहे.