कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 08:29 AM2021-11-26T08:29:17+5:302021-11-26T08:29:34+5:30
दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवानामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडला आहे.
नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिका(South Africa), हाँगकाँग (Hong Kong) आणि बोत्सवानामध्ये (Botswana) कोविड-19 चे नवीन व्हेरिएंट (Coronavirus New Variant) सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. गुरुवारी केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) देखील या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, 'NCDC कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट B.1.1529 ची बोत्सवानामध्ये 3, दक्षिण आफ्रिकेत 6 आणि हाँगकाँगमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे.' शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात म्युटेशन करू शकतो.
भूषण पुढे म्हणाले की, या तीन देशांशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी नियमावलीत इतर काही देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवरही बारकाईने लक्ष देण्यास सांगितले आहे. MoHFW मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कांचा देखील बारकाईने मागोवा घेतला पाहिजे आणि त्यांची चाचणी केली पाहिजे, असे पत्रात म्हटले आहे. जीनोमिक सिक्वेन्सिंगमध्ये आतापर्यंत 10 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.
डॉ. टॉम पीकॉक, इम्पीरियल कॉलेज लंडनमधील विषाणूशास्त्रज्ञ, यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नवीन व्हेरिएंट (b.1.1.529)ची माहिती दिली होती. तेव्हापासून इथर शास्त्रज्ञही या नव्या व्हेरिएंटचा शोध घेत आहेत. प्रोफेसर एड्रियन पुरेन, NICD चे कार्यवाहक कार्यकारी संचालक म्हणतात की, 'दक्षिण आफ्रिकेत एक नवीन पॅटर्न सापडला आहे. आमचे तज्ञ नवीन पॅटर्न समजून घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. लवकरच या व्हेरिएंटविषयी अधिक माहिती मिळेल.