'या' दिवशी PM मोदी 50 लाख नवीन मतदारांना संबोधित करणार, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची मोठी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 06:39 PM2024-01-11T18:39:15+5:302024-01-11T18:41:38+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे लक्ष नवीन मतदारांना, विशेषत: तरुणांना जोडण्यावर आहे.

new voters pm narendra modi address virtual conference january 24, bjp plan  | 'या' दिवशी PM मोदी 50 लाख नवीन मतदारांना संबोधित करणार, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची मोठी योजना

'या' दिवशी PM मोदी 50 लाख नवीन मतदारांना संबोधित करणार, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची मोठी योजना

नवी दिली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने येत्या 24 जानेवारीला नवीन मतदार परिषदेची तयारी करत आहे, ज्यामध्ये अंदाजे 50 लाख नवीन मतदारांचे स्वागत केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला व्हर्च्युअली संबोधित करणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे लक्ष नवीन मतदारांना, विशेषत: तरुणांना जोडण्यावर आहे. भाजपा युवा मोर्चा देशभरात 5000 ठिकाणी युवा मतदार परिषदेची तयारी करत आहे. 24 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 लाख तरुण मतदारांना संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. तरुणांच्या विशेषत: पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांच्या भूमिकेबाबत भाजपाने आराखडा तयार केला असून, ही योजना राबविण्याची जबाबदारी युवा मोर्चाकडे देण्यात आली आहे.

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना महत्त्व देऊन भाजपा युवक आघाडी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 24 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 लाख तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांशी संवाद साधतील. याशिवाय तरुण मतदारांशी संवाद साधण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. भाजपा युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष असलेले काही ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या युवा संवाद कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अनुराग आणि किशन रेड्डी देखील सहभागी होणार आहेत. भाजपा युवक आघाडीच्या वतीने घरोघरी संपर्क अभियान राबविणार आहे. नवीन मतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी 21 जानेवारीला सर्व विधानसभा मतदारसंघात रॅली काढण्यात येणार आहेत. जानेवारीअखेर शाळा-महाविद्यालयांमध्ये नवीन मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

तरुणांना आकर्षित करण्याची भाजपाची योजना
12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त "यंग व्होटर्स – फेटमेकर्स ऑफ इंडिया" या विषयावर जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना 24 जानेवारी रोजी बक्षिसे दिली जातील. या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक योजना आखली आहे. या योजनेंतर्गत भाजपाच्या युवा मोर्चातर्फे तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
 

Web Title: new voters pm narendra modi address virtual conference january 24, bjp plan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.