नव्या वर्षात ७ लाख रोजगारांची निर्मिती होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:30 AM2020-01-03T03:30:45+5:302020-01-03T07:02:44+5:30
सर्व खासगी क्षेत्रात; स्टार्टअप कंपन्यांत सर्वाधिक संधी
मुंबई : आर्थिक मंदी, वस्तूंना बाजारात उठाव नाही, उत्पादन कमी आणि त्यामुळे रोजगारांत घट अशा बातम्या गेल्या काही काळापासून सतत येत असताना नव्या वर्षात खासगी क्षेत्रामध्ये ७ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होणार असल्याची आनंदाची बातमी एका सर्व्हेमुळे समोर आली आहे. सर्व्हेच्या अहवालानुसार २0२0 मध्ये १२ विविध क्षेत्रांमध्ये हे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
अर्थातच या सर्व नोकऱ्या खासगी उद्योगात, प्रामुख्याने स्टार्टअप कंपन्यांतील असतील, असे दिसते. सध्याच्या कर्मचाऱ्यांना ८ ते १0 टक्के वेतनवाढ मिळेल, असे या कंपन्यांनी केलेल्या अहवालातून समोर आले. तर यंदा कर्मचाऱ्यांना १0 टक्के बोनस मिळण्याचीही शक्यता आहे.
मायहायरिंगग्जक्लब डॉट कॉम व सरकारीनौकरी या कंपन्यांनी ४२ शहरांतील ४२७८ कंपन्यांतील नोकरभरतीची माहिती घेऊन हा अहवाल तयार केला. यंदा स्टार्टअप कंपन्या मोठी नोकरभरती करतील. मोठ्या शहरांमध्ये खर्च अधिक येत असल्याने काही लहान शहरांमध्ये उद्योग सुरू होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांनी गेल्या वर्षी केलेल्या सर्व्हेतून ६ लाख २0 हजार रोजगारनिर्मिती खासगी क्षेत्रात होणार असल्याचे दिसून आले होते. प्रत्यक्षात ५ लाख ९0 हजार रोजगार निर्माण झाले.
कोणती आहेत ही क्षेत्रे?
रिटेल व ई-कॉमर्स या दोन क्षेत्रांमध्ये १ लाख १२ हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता असून, आयटीमध्ये १,0५,५00 नोकºया उपलब्ध होतील. एफएमसीजीमध्ये ८७ हजार ५00, उत्पादन क्षेत्रात ६८ हजार ९00, आरोग्यसेवा क्षेत्रात ९८ हजार ३00 रोजगार तयार होणार असून आणि बँकिंग, फायनान्शिअल सेवा आणि इन्शुरन्स या क्षेत्रांमध्ये ५९ हजार ७00 जणांना नोकºया मिळू शकतील. मुंबई, बंगळुरू, दिल्ली व एनसीआर, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद व पुणे या प्रमुख शहरांत निर्माण होणाºया रोजगारांची संख्या ५ लाख १५ हजारांच्या आसपास असेल, असे हा सर्व्हे सांगतो.