नव्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहील - जेटली

By admin | Published: January 1, 2017 01:34 PM2017-01-01T13:34:32+5:302017-01-01T15:24:35+5:30

गेल्या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा जगात सर्वाधिक होता, आता नव्या वर्षातही अर्थव्यस्थेच्या वाढीचा वेग कायम राहील

In the new year the economy of the Indian economy will be sustained - Jaitley | नव्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहील - जेटली

नव्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहील - जेटली

Next
ऑनलाइन लोकमत
 नवी दिल्ली, 1 - गेल्या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा जगात सर्वाधिक होता, आता नव्या वर्षातही अर्थव्यस्थेच्या वाढीचा वेग कायम राहील, असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.
नव्या वर्षांच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जेटली यांनी नोटांबंदीसह विविध मुद्यांवर आपले मत मांडले. यावेळी  जेटली म्हणाले,  "नोटाबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर रोकड बँकिंग सिस्टीममध्ये आली आहे. त्यात काळ्या पैशाचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा व्यवस्थेत आल्याने बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढणार आहे. गेल्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगावे वाढत असलेली अर्थव्यवस्था ठरली होती. आता नव्या वर्षातही ही वाढ कायम राहील." तसेच आगामी काळात  महागाई नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
त्याबरोबरच कॅशलेस अर्थव्यवस्था आणि जीएसटीचाही जेटली यांनी यावेळी उल्लेख केला. " कॅशलेस अर्थव्यवस्था आणि जीएसटीची अंमलबजावणी ही नव्या वर्षाची वैशिष्ट्ये ठरतील," असे जेटली म्हणाले. 

Web Title: In the new year the economy of the Indian economy will be sustained - Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.