नव्या वर्षात सूर्य, चंद्राचे होणार अनोखे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 02:45 AM2019-12-29T02:45:34+5:302019-12-29T02:45:45+5:30

सुट्ट्यांची चंगळ; चार गुरुपुष्ययोग, वर्षभरात एकही अंगारकी चतुर्थी नाही, २0२0 लीप वर्ष

New Year's sun, moon and moon will be unique | नव्या वर्षात सूर्य, चंद्राचे होणार अनोखे दर्शन

नव्या वर्षात सूर्य, चंद्राचे होणार अनोखे दर्शन

Next

मुंबई : बुधवारपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्ष २०२० मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ असेल. लीप वर्ष असल्याने कामासाठी वर्षात एक दिवस जास्त असेल. खगोलप्रेमींसाठी कंकणाकृती सूर्यग्रहण दर्शन, सुपर मून दर्शन, ब्लू मून योग, सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी चार गुरुपुष्य योग असतील. तसेच या वर्षात अश्विन अधिकमास असेल, असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

सोमण म्हणाले की, नूतन वर्ष २०२०मध्ये दोन सूर्यग्रहणे आणि चार चंद्रग्रहणे म्हणजे एकूण सहा ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी २१ जूनच्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंड या राज्यांतील काही भागांतून दिसेल. उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. १४ डिसेंबरला होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. १० जानेवारी व ५ जूनचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसेल, तर ५ जुलै व ३० नोव्हेंबरचे छायाकल्प चंद्रग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. सोने खरेदी करणाºयांसाठी नवीन वर्षात २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर असे चार गुरुपुष्य योग आहेत. या नवीन वर्षात एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी नसेल. २०२०मध्ये १८ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबर या काळात अधिक अश्विनमास असेल. त्यामुळे गणेशोत्सवाचा भाद्रपद महिना झाल्यानंतर नवरात्र-घटस्थापना एक महिना उशिरा येणार आहे. त्यामुळे दसरा-दिवाळी हे सणही उशिरा येतील. २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीत २९ दिवस आल्याने या वर्षात एकूण ३६६ दिवस असतील. कामांची पूर्तता करण्यासाठी १ दिवस जास्त मिळेल.

‘ब्लू मून’ची पर्वणी
७ एप्रिल रोजी रात्री आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र ३ लक्ष ५६ हजार ९०७ किमी. इतका पृथ्वीजवळ आल्याने १४ टक्के मोठा व जास्त तेजस्वी दिसेल. नवीन वर्षी १ व ३१ आॅक्टोबर अशा दोन पौर्णिमा आल्यामुळे ३१ आॅक्टोबरला ‘ब्लू मून’ योग आला आहे.

वर्षभरात २४ सुट्ट्या
प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), पारसी नवीन वर्ष (१६ आॅगस्ट), मोहरम (३० आॅगस्ट), विजयादशमी (२५ आॅक्टोबर) या चारच सुट्ट्या रविवारी येतील. इतर २० सुट्ट्यांपैकी बकरी ईद (१ आॅगस्ट), स्वातंत्र्य दिन (१५ आॅगस्ट), श्रीगणेश चतुर्थी (२२ आॅगस्ट), दिवाळी लक्ष्मीपूजन (१४ नोव्हेंबर) या सुट्ट्या शनिवारी-रविवारच्या सुट्टीला जोडून येणार आहेत. तसेच श्रीमहावीर जयंती (६ एप्रिल), रमजान ईद (२५ मे), दिवाळी बलिप्रतिपदा (१६ नोव्हेंबर), गुरुनानक जयंती (३० नोव्हेंबर) या सुट्या सोमवार, रविवारला जोडून येतील.

Web Title: New Year's sun, moon and moon will be unique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.