धोनीची हमर कार पाहून न्युझीलंडचे खेळाडू चकित
By Admin | Updated: October 25, 2016 20:23 IST2016-10-25T20:23:55+5:302016-10-25T20:23:55+5:30
आपल्या घरच्या मैदानात सामना होत असल्याने धोनीने विमानतळावरून आपल्या स्वत:च्या कारमधून घरी जाण पसंत केले. यावेळी धोनीने स्वत: कार चालवली.

धोनीची हमर कार पाहून न्युझीलंडचे खेळाडू चकित
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 25 - उद्या होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत- न्युझीलंडचे संघ रांचीत दाखल झाले. आपल्या घरच्या मैदानात सामना होत असल्याने धोनीने विमानतळावरून आपल्या स्वत:च्या कारमधून घरी जाण पसंत केले. यावेळी धोनीने स्वत: कार चालवली. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ देखील विमानतळावर दाखल झाल्यानंतर खासगी बसने हॉटेलच्या दिशेने रवाना होत होता. न्यूझीलंडचे खेळाडू ज्या बसने जात होते, त्या बसच्या बाजूने धोनी आपली कार घेऊन जात होता. धोनीच्या हमर कारने न्यूझीलंडच्या खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले. पाहुण्या संघाचे खेळाडू रॉस टेलर आणि टॉम लॅथमयांनी आपल्या बसमधून धोनीची कार न्याहाळत असताना ते कॅमेरात कैद झाले.
धोनीचे बाईक्स आणि कारवरील प्रेम जगजाहीर आहे. त्याच्याकडे विविध कंपन्यांच्या गाड्या, बाईक आहेत. धोनीच्या गाड्यांच्या ताफ्यात विविध लक्षवेधी कार आणि बाईक्सचा समावेश आहे. धोनीकडील कारच्या ताफ्यात २००९ साली हमर ही आलिशान कार दाखल झाली होती.