भारताच्या NSG सदस्यत्वासाठी न्यूझीलंड सकारात्मक

By Admin | Published: October 26, 2016 06:59 PM2016-10-26T18:59:44+5:302016-10-26T18:59:44+5:30

भारताच्या अणू पुरवठादार देशांच्या संघटनेमधील (एनएसजी) सदस्यत्वासाठी आपण सकारात्मक असल्याचे न्यूझीलंडने बुधवारी जाहीर केले.

New Zealand positive for India's NSG membership | भारताच्या NSG सदस्यत्वासाठी न्यूझीलंड सकारात्मक

भारताच्या NSG सदस्यत्वासाठी न्यूझीलंड सकारात्मक

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 26 - भारताच्या अणू पुरवठादार देशांच्या संघटनेमधील (एनएसजी) सदस्यत्वासाठी आपण सकारात्मक असल्याचे न्यूझीलंडने बुधवारी जाहीर केले. न्यूझीलंडचे पंतप्रधान  जॉन की आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात संबंध दृढ करण्याबाबत सहमती दर्शवली. त्यावेळी न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी न्यूझीलंड भारताच्या एनएसजी सदस्यत्वाबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही दिली.  
मात्र 48 देश सदस्य असलेल्या एनएसजीमधील सदस्यत्वासाठी न्यूझीलंडने स्पष्टपणे पाठिंबा दिलेला नाही. मात्र न्यूझीलंडने भारताची स्वच्छ ऊर्जेची गरज ओळखली असून,  भारतात अणुऊर्जेच्या प्रसारासाठी जागतिक नियमांमध्ये स्पष्टता येण्याची गरज असल्याचे मान्य केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. "एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना न्यूझीलंड सातत्यपूर्वक आणि रचनात्मकपणे सहकार्य करत राहील. तसेच याबाबत लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी एनएसजीच्या सदस्य देशांसोबत न्यूझीलंड प्रयत्नशील राहील," असे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की म्हणाले. दरम्यान,  न्यूझीलंडच्या भूमिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.  "भारताच्या एनएसजी सदस्यत्वासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत मी न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांचे आभार मानतो," असे मोदी म्हणाले. 
अणुप्रसार  करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या देशांना एनएसजीचे सदस्यत्व देण्यात येऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्या देशांमध्ये न्यूझीलंडचाही समावेश आहे. तसेच भारतालाही या नियमातून सूट देण्यात येऊ नये , असे जून महिन्यात दक्षिण कोरिया येथे झालेल्या  एनएसजीच्या बैठकीत स्पष्टपणे म्हटले होते. या बैठकीत भारत आणि न्यूझीलंडमध्ये दहशतवादाच्या मुद्यावर एकमत झाले आहे. तसेच या भेटीत दोन्ही देशांमध्ये विविध करारांवही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.  

Web Title: New Zealand positive for India's NSG membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.