पाठवणी करताना रडता रडता नवरी बेशुद्ध; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 10:24 AM2021-03-06T10:24:23+5:302021-03-06T10:40:18+5:30

इथे शुक्रवारी एका लग्नाचा आनंद दु:खात बदलला. इथे जुलांडा गावचे मुरली साहू यांची मुलगी रोजीचं बलांगीर जिल्ह्यातील टेटलगावातील बिसीकेसनसोबत लग्न झालं.

Newlywed bride dies of heart attack due to crying incessantly during in sonepur Odisha | पाठवणी करताना रडता रडता नवरी बेशुद्ध; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा

पाठवणी करताना रडता रडता नवरी बेशुद्ध; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा

googlenewsNext

ओडिशाच्या सोनपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका नवरीला सार करतानाच तिचा मृत्यू झाला. सासरी जाताना नवरी इतकी रडली की तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.  ही घटना ओडिशातील सोनपूरची आहे.

इथे शुक्रवारी एका लग्नाचा आनंद दु:खात बदलला. इथे जुलांडा गावचे मुरली साहू यांची मुलगी रोजीचं बलांगीर जिल्ह्यातील टेटलगावातील बिसीकेसनसोबत लग्न झालं. पण जेव्हा तिची पाठवणी सुरू होती तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली.

पाठवणी होत असताना नवरी सतत आणि खूप जास्त रडत होती. मग ती अचानक बेशुद्ध झाली आणि खाली कोसळली. उपस्थित नातेवाईकांनी आणि घरातील लोकांनी तिच्या हाताची मालीश केली. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण ती काही शुद्धीवर आली नाही. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 

हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. माहिती मिळताच पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पोस्टमार्टमनंतर मृतदेह परिवाराला सोपवण्यात आला आहे. रोजीच्या अशाप्रकारे झालेल्या मृत्यूने घरातील लोक दु:खी आहेत.

जुलुंडा गावातील एका व्यक्तीने सांगितले की, रोजी फार तणावात जगत होती. कारण काही महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. तिचे मामा आणि काही सामाजिक संस्थांनी मिळून तिच्या लग्नाचं आयोजन केलं होतं.
 

 

Web Title: Newlywed bride dies of heart attack due to crying incessantly during in sonepur Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.