बातमी १ पान
By Admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:44+5:302015-09-04T22:45:44+5:30
दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत
द ष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईतपुलाखाली मांडला संसार : विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो कुटुंबियांचे स्थलांतरप्राची सोनावणेनवी मुंबई : पावसाने ओढ दिल्याने नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. प्यायला पाणी व हाताला काम नसल्यामुळे शेकडो दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यातील मुंबईकडे येऊ लागले आहेत. मिळेल ते काम करून अन् मिळेल तिथे मुक्काम करून आयुष्य कंठत आहेत. सप्टेंबर सुरू झाला तरी, अद्याप राज्याच्या अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही. विदर्भ, मराठवड्यात पिके उन्हामुळे करपत आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्षही पडू लागले आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधार्थ जालना, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली व इतर जिल्ह्यांतील जवळपास ४०० कुटंुबे नवी मुंबईत आली आहेत. यामधील जवळपास १०० जणांनी तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. अनेकजण नाकाकामगार म्हणून मिळेल ते काम करत आहेत. दिवसभर काम करून मिळालेल्या पैशांनी धान्य विकत घेऊन पुलाखालीच दगडाच्या चुलीवर जेवण बनविले जात आहे.