प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन; कोरोनावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 01:42 PM2021-04-30T13:42:24+5:302021-04-30T13:44:46+5:30

रोहित सरदाना यांच्या निधनानं माध्यम क्षेत्रात शोककळा; अनेकांकडून दु:ख व्यक्त

news anchor rohit sardana dies due to coronavirus | प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन; कोरोनावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन; कोरोनावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका

googlenewsNext

नवी दिल्ली: प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. झी न्यूजमध्ये प्रदिर्घ काळ काम केलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये कार्यरत होते. झी न्यूजमध्ये वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या सुधीर चौधरींनी सरदाना यांच्या निधनाची माहिती ट्विट करून दिली. कोरोना विषाणू आमच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला आमच्यापासून हिरावून नेईल याची कल्पनादेखील केली नव्हती, असं चौधरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



'थोड्याच वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझे हात थरथरू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदाना यांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. हा विषाणू आमच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला आमच्यापासून हिरावून नेईल याची कल्पनादेखील केली नव्हती. यासाठी मी तयार नव्हतो. हा देवानं केलेला अन्याय आहे. ओम शांती,' असं चौधरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



वृत्तवाहिन्यांमधला प्रसिद्ध चेहरा असलेले रोहित सरदाना आज तक वृत्तवाहिनीच्या 'दंगल' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचे. २०१८ मध्ये त्यांचा गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीदेखील सरदाना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 'मित्रांनो, अतिशय वाईट बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Read in English

Web Title: news anchor rohit sardana dies due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.