मोदी यांच्या भाषणाच्या वृत्ताने देशभर अफवांना आला ऊत; बंकरमध्ये घुसू की एटीएमसमोर जाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:17 AM2019-03-28T05:17:28+5:302019-03-28T05:17:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी ११.४५ ते १२ च्या सुमारास रेडिओ व दूरदर्शनवरून भाषण करणार असल्याचे वृत्त येताच, निवडणुकीची आचारसंहिता असताना, ते नेमके बोलणार तरी काय, याची देशभर व समाजमाध्यमांत जोरदार चर्चा सुरू झाली.

The news of Modi's speech came to rumors across the country; go to Bunker or ATM? | मोदी यांच्या भाषणाच्या वृत्ताने देशभर अफवांना आला ऊत; बंकरमध्ये घुसू की एटीएमसमोर जाऊ?

मोदी यांच्या भाषणाच्या वृत्ताने देशभर अफवांना आला ऊत; बंकरमध्ये घुसू की एटीएमसमोर जाऊ?

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी ११.४५ ते १२ च्या सुमारास रेडिओ व दूरदर्शनवरून भाषण करणार असल्याचे वृत्त येताच, निवडणुकीची आचारसंहिता असताना, ते नेमके बोलणार तरी काय, याची देशभर व समाजमाध्यमांत जोरदार चर्चा सुरू झाली. त्यांचे प्रत्यक्ष भाषण सुरू होईपर्यंत वृत्तवाहिन्यांनी सर्व शक्यता वर्तवून त्यावर चर्चाही सुरू केल्या.
काहींना नोटाबंदीची आठवण झाली आणि धडकी भरली, तर विजय मल्ल्या व नीरव मोदी यांना भारतात आणण्यात मोदींना यश आले की काय, असा प्रश्न पडला. मोदी यांनी दाऊ द इब्राहिमला भारतात आणून दाखवले की काय, अशी चर्चा समाजमाध्यमांत सुरू झाली, तर काहींनी मसूद अझहरला भारतात आणले असल्याची घोषणा होईल, असे मेसेज पाठवायला सुरुवात केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत पुन्हा पाकवर हल्ला करू शकतो, असे विधान मंगळवारीच केले होते. त्यामुळे मोदींनी युद्धाचा निर्णय घेतला की, सर्जिकल वा एअर स्ट्राईक केला, असा प्रश्न अनेकांना पडला.

या सामर्थ्याचे माहात्म्य काय?
अंतराळ संशोधनात प्रगत असलेले सर्वच देश या तंत्रज्ञानाचा वापर फक्त शांततामय उपयोगासाठी करण्याच्या आणाभाका घेत असले तरी आपल्या संरक्षण सिद्धतेच्या बळकटीसाठीही ते वापरणे हा एक अंतस्थ हेतू असतो. दळणवळण आणि दिशानिर्देशन अशा निरागस कामासाठी सोडलेले उपग्रह क्षेपणास्त्रांचा मार्ग, दिशा व अचूकता ठरविण्याचेही काम करू शकतात. त्यामुळे शत्रूची आक्रमक क्षेपणास्त्रे थोपविण्याच्या क्षमतेसोबत त्या क्षेपणास्त्रांचा ‘मेंदू’ म्हणून काम करणारे त्यांचे उपग्रहच प्रसंगी नष्ट करण्याची क्षमता आत्मसात असलेला प्रतिस्पर्धी वरचढ ठरतो. अमेरिका व रशियाने ४० वर्षांपूर्वी व चीनने गेल्या दशकात ही क्षमता आत्मसात केली; परंतु याचा वापर शत्रूचे उपग्रह नष्ट करण्यासाठी कधीच केला जात नाही.

बंकरमध्ये घुसू की एटीएमसमोर जाऊ?
- काहींनी तर निवडणुका रद्द करून मोदी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर करणार असल्याची आवई उठवली. कदाचित ते युद्धजन्य स्थितीमुळे बाह्य आणीबाणीही जाहीर करतील, असे अनेकांनी बोलून दाखवले.
- अनेकांनी तेवढ्या वेळेत विनोदही व्हॉटस्अ‍ॅपवर शेअर केले.
- ‘बंकरच्या आत घुसायचे की एटीएमपुढे रांग लावायची, तेवढेच आम्हाला सांगा,’ असा एक विनोद व्हायरल झाला.

Web Title: The news of Modi's speech came to rumors across the country; go to Bunker or ATM?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.