लग्नापूर्वीच वधूच्या मृत्यूची बातमी, मग सांगितलं अपहरण झालं, बिंग फोडत पोलिसांनी असं शोधून काढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 19:26 IST2025-02-19T19:26:14+5:302025-02-19T19:26:35+5:30
Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात लग्नापूर्वी नववधूचं अपहरण झाल्याची बातमी आल्याने खळबळ उडाली. तत्पूर्वी सोशल मीडियावर हार्ट फेल झाल्याने नववधूचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र जेव्हा पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत तपास सुरू केला. तेव्हा सत्य काही वेगळंच असल्याचं समोर आलं.

लग्नापूर्वीच वधूच्या मृत्यूची बातमी, मग सांगितलं अपहरण झालं, बिंग फोडत पोलिसांनी असं शोधून काढलं
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात लग्नापूर्वी नववधूचं अपहरण झाल्याची बातमी आल्याने खळबळ उडाली. तत्पूर्वी सोशल मीडियावर हार्ट फेल झाल्याने नववधूचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र जेव्हा पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत तपास सुरू केला. तेव्हा सत्य काही वेगळंच असल्याचं समोर आलं.
ही घटना नवी मंडी पोलीस चौकीच्या हद्दीतील शांतीनगर येथे घडली. येथे डॉ. भारत भूषण यांचा मुलगा विजय बूषण याचा विवाह झाशी येथील डॉक्टर सुष्मना शर्मा हिच्यासोबत ठरला होता. मंगळवारी संघ्याकाळी वधू ब्युटी पार्लरमध्ये सजण्यासाठी गेली होती. मात्र तिथून ती अचानक बेपत्ता झाली.
कुटुंबीयांनी पोलिसांकडे अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासासाठी पोलिसांनी दोन पथकांची नियुक्ती केली. अखेरीस ही नववधू झाशी येथे सापडली. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन कोर्टात जबाब नोंदवण्यासाठी नेण्यात आले. मात्र या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, ही नववधू तिच्या मैत्रिणीसोबत निघून गेली होती, असे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून याबाबत अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात येत नाही आहे. नवी मंडीच्या सीओ रुपाली राव यांनी सांगितले की, पोलिसांना अपहरणाची खबर मिळाली होती. त्यानंतर कारवाई करून या नववधूला शोधून काढण्यात आलं आहे.
आता या नववधूचं खरंच अपहरण झालं होतं की ती स्वत:च निघून गेली होती. याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणी परिसरात चर्चांना उधाण आलं आहे.