एनडीटीव्हीवरील बंदीबाबत पुढील सुनावणी 5 डिसेंबरला
By admin | Published: November 8, 2016 03:42 PM2016-11-08T15:42:42+5:302016-11-08T15:42:42+5:30
एनडीटीव्ही इंडियावर घालण्यात आलेल्या बंदीविरोधातील पुढील सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - एनडीटीव्ही इंडियावर घालण्यात आलेल्या बंदीविरोधातील पुढील सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने घातलेल्या एक दिवसाच्या बंदीविरोधात एनडीटीव्हीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 5 डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने एनडीटीव्हीवर घालण्यात आलेल्या बंदीला तात्पुरती स्थगिती दिली होती.
जानेवारी महिन्यात पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी एअरबेसमधील संवेदनशील भागाची माहिती प्रसारित केल्याचा आरोप ठेवत सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने एनडीटीव्हीवर एका दिवसाची बंदी घातली होती. त्यानंतर या बंदीवरून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या बंदीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता.
SC defers NDTV ban case hearing for 5 December saying there is no urgency for hearing. MIB already stayed the ban yesterday.
— ANI (@ANI_news) 8 November 2016