'नीट' संदर्भात पुढील सुनावणी ९ मे रोजी
By admin | Published: May 6, 2016 04:50 PM2016-05-06T16:50:12+5:302016-05-06T16:50:12+5:30
सर्वोच्च न्यायालयाने नीटची सुनावणी पुढे ढकलल्याने प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांच्या जिवाचा घोर आजही कायम राहिला.आता ही सुनावणी सोमवारी ९ मे रोजी होईल
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ : वैद्यकीय प्रवेशांसाठी देशपातळीवर एकच ‘नीट’ परीक्षा घेण्याच्या आधीच्या आदेशात फेरबदल करण्यासाठी करण्यात आलेल्या याचिकांवर लगेच विचार करून निर्णय देण्याची काही घाई नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांच्या जिवाचा घोर आजही कायम राहिला. आता ही सुनावणी सोमवारी ९ मे रोजी होईल.
निदान या वर्षी तरी आमच्यावर ‘नीट’ लादू नका यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्य सरकारांनी, काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिका आज दुपारी न्या. अनिल आर. दवे, न्या. शिव कीर्ती सिंग व न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठापुढे आल्या. परंतु ‘नीट’ परीक्षेची प्रक्रिया याआधीच सुरू झालेली असल्याने आता या नव्या याचिकांवर तातडीने निर्णय करण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटत नाही. आम्ही सर्व पक्षांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेऊन नंतरच काय ते ठरवू, असे खंडपीठाने सांगितले.