पुढील वर्षी पतंजलीची उलाढाल १०,००० करोड
By admin | Published: April 26, 2016 05:17 PM2016-04-26T17:17:12+5:302016-04-26T17:17:12+5:30
स्वदेशी उत्पादनाचा मुद्दा घेऊन बाजारात उतरलेल्या पतंजलि आयुर्वेद कंपनीची यावर्षीचा उलाढाल ५,००० करोड रुपये झाला आहे. एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबांनी ही महिती दिली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - स्वदेशी उत्पादनाचा मुद्दा घेऊन बाजारात उतरलेल्या पतंजलि आयुर्वेद कंपनीची यावर्षीचा उलाढाल ५,००० करोड रुपये झाला आहे. एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबांनी ही महिती दिली. सन २०१६-१७ साठी १०,००० करोडचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी रामदेव बाबा म्हणाले, 'आम्ही कमी किमतीत लोकांना चांगल्या वस्तू पुरवत आहोत. याचबरोबर आम्ही देशी तुपाचे मार्केट उभे केले आहे. २०१२ मध्ये खुल्या बाजारपेठेत दाखल झालेल्या पतंजलीने चार वर्षात १,१०० टक्के प्रगती केली आहे.
आगामी काळात उत्पादने आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक ही दुपट्टीनं वाढवणार असल्याचा मनसुबा बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांकडून शुद्ध उत्पादने घेऊन, ग्राहकांपर्यंत निर्भेळ उत्पादने देण्याचा आपला शुद्ध हेतू असल्याचा पुनरुच्चार रामदेव बाबा यांनी केला.