परदेशी देणगीदारांकडून ‘फिल्ड रिपोर्ट’ साठी एनजीओचा वापर

By admin | Published: July 17, 2014 02:19 AM2014-07-17T02:19:34+5:302014-07-17T02:19:34+5:30

काही परदेशी देणगीदार ‘फिल्ड रिपोर्ट’ मिळविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा (एनजीओ) वापर करीत आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी नमूद केले

NGOs use 'field report' from foreign donors | परदेशी देणगीदारांकडून ‘फिल्ड रिपोर्ट’ साठी एनजीओचा वापर

परदेशी देणगीदारांकडून ‘फिल्ड रिपोर्ट’ साठी एनजीओचा वापर

Next

नवी दिल्ली : काही परदेशी देणगीदार ‘फिल्ड रिपोर्ट’ मिळविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा (एनजीओ) वापर करीत आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी नमूद केले. राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांच्या अतारांकित प्रश्नाला मंत्र्यांनी बुधवारी दिलेल्या लिखित उत्तरात ही बाब पुढे आली.
गृहमंत्रालयाने स्वयंसेवी संस्थांच्या अनियमिततेची २४ प्रकरणे सीबीआयकडे सोपविली आहेत. आणखी १० प्रकरणे अधिक तपासासाठी संबंधित राज्य पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. एनजीओंच्या उपक्रमांची चौकशी सरकारने सुरू केली आहे काय आणि एनजीओंच्या किती उपक्रमांमध्ये सरकारला गडबड आढळून आली आहे, त्यापैकी कितीजणांविरुद्ध खटला भरण्यात आला आहे, असा प्रश्न दर्डा यांनी विचारला होता.
परदेशी देणगीदार स्थानिक एनजीओंकडून ‘फिल्ड रिपोर्ट’ मागवतात आणि त्याचा वापर भारताच्या विरोधात केला जातो. पाश्चिमात्य सरकारांच्या हितासाठी सामरिक परदेशी धोरणाकरिता त्याचा शस्त्रसारखा वापर होतो. ही वस्तुस्थिती आहे काय, असा प्रश्न उपस्थित केल्यावर मंत्री म्हणाले, काही परदेशी देणगीदार स्थानिक एनजीओंचा ‘फिल्ड रिपोर्ट’ मिळवण्यासाठी वापर करीत असल्याची माहिती आहे.
ग्रीनपीस ही एनजीओ अमेरिकेतील कोळसाविरोधी लॉबिंग गटाला हाताशी धरून भारताच्या ऊर्जा प्रकल्पांना अस्थिर करू पाहत आहे आणि भारताच्या ‘राष्ट्रीय आर्थिक सुरक्षे’ला धोका पोहोचवू पाहत आहे, असा अहवाल अलीकडे आयबीने दिला होता. आयबीने ग्रीनपीसची एफसीआरए नोंदणी रद्द करण्याचा सरकारला सल्ला दिला. (लोकमत न्यूजवर्क)

Web Title: NGOs use 'field report' from foreign donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.