झाकिर नाईकला 14 मार्चपर्यंत हजर राहण्याची NIAची नोटीस

By admin | Published: March 7, 2017 11:54 PM2017-03-07T23:54:23+5:302017-03-07T23:54:23+5:30

इस्लामिकचे वादग्रस्त उपदेशक झाकीर नाईकला एनआयएनं चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात 14 मार्चपर्यंत हजर राहण्याची नोटीस बजावली

NIA notice to appear before March 14 till Zakir Naikika | झाकिर नाईकला 14 मार्चपर्यंत हजर राहण्याची NIAची नोटीस

झाकिर नाईकला 14 मार्चपर्यंत हजर राहण्याची NIAची नोटीस

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - इस्लामिकचे वादग्रस्त उपदेशक झाकीर नाईकला एनआयएनं चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात 14 मार्चपर्यंत हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने झाकिर नाईकची बहीण नैलाह नुरानीची आज चौकशी केली. चिथावणीखोर भाषण करून तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यास प्रोत्साहन दिल्याचे झाकीर नाईकवर आरोप झाल्यानंतर सरकारने त्याच्या पीस टीव्हीसह संकेतस्थळांवर बंदी घातली होती. एनआयए आणि मुंबई पोलिसांनी त्याच्या मुंबईतील मालमत्तांवर छापा टाकून तपासणीही केली असता नाईकने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पैशांची मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते. तरुणांना दहशतवादाकडे जाण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल एनआयएने नाईकविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा नोंदवला असून, मुस्लिम तरुणांना भडकावण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनीही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अंमलबजावणी संचालनालयाने नाईकला समन्स बजावून जानेवारीच्या अखेरपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले असतानाही नाईक सक्तवसुली संचलनालयासमोर हजर झाला नव्हता. पोलिसांनी अटक करू नये म्हणून नाईक सौदी अरेबियात लपून बसल्याचे सांगण्यात येत होते. नाईकने अवैधरीत्या पैसे कुठून जमवले आहेत आणि त्यांचा गुन्ह्यांसाठी वापर कसा केला आहे, याचीही ईडी चौकशी करत आहे. नाईकचं घर आणि कार्यालयातून हस्तगत केलेली अनेक कागदपत्रांचीही छाननी करण्यात आली आहे.
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर ईडीने झाकीर नाईकला वारंवार समन्स बजावलेत. काही दिवसांपूर्वी झाकीर नाईकने त्याच्या वकिलांमार्फत ईडीला उत्तर दिले होते. हजर होण्याबाबत नाईकने काही महिन्यांची मुदत मागून घेतली होती. तसेच स्काइप, फोनवरून ईडीच्या चौकशीला सामोरा जाण्यास तयार आहे. तसेच ईडीला हवी असलेली सर्व कागदपत्रे, माहिती देण्यास तयार असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. मात्र अंमलबजावणी संचलनालयानं झाकीर नाईकची ही मागणी फेटाळून लावली होती. आर्थिक गैरव्यवहारांतर्गत अशा प्रकारची तरतूद नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

Web Title: NIA notice to appear before March 14 till Zakir Naikika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.