उत्तरप्रदेशमध्ये एनआयए अधिका-याची गोळया घालून हत्या
By admin | Published: April 3, 2016 10:49 AM2016-04-03T10:49:15+5:302016-04-03T11:00:10+5:30
उत्तरप्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी मोहम्मद तंझील यांची गोळया घालून हत्या केली.
Next
ऑनलाइन लोकमत
बिजनौर, दि. ३ - उत्तरप्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी मोहम्मद तंझील यांची गोळया घालून हत्या केली. पोलिस उपअधीक्षक असणारे मोहम्मद तंझील एनआयएमध्ये काम करत होते. रात्रीचे लग्न आटोपून तंझील आणि त्यांची पत्नी साहसपूर येथील त्यांच्या घराच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला.
दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जबरदस्तीने त्यांची गाडी थांबवली व जवळून त्यांच्यावर गोळया झाडल्या. सेओहारा भागात ही घटना घडली. मोहम्मद तंझील यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांना नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तंझील यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही होती. ती मागच्या सीटवर बसली होती. सुदैवाने ते या गोळीबारातून बचावले. दोन्ही मुले सुखरुप आहेत. मोहम्मद तंझील यांचा मृतदेह ज्या मोरदाबाद येथील रुग्णालयात आहे तिथे एनआयए आणि एटीएसचे पथक दाखल झाले आहे. पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे.
NIA and ATS teams reach the Moradabad hospital where body of the NIA official is kept pic.twitter.com/mPBsHuMF2r
— ANI (@ANI_news) April 3, 2016