NIA Raid On PFI: PFI वर NIAची सर्वात मोठी कारवाई; 106 जणांना अटक, अमित शहा-अजित डोभालांची मीटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 01:31 PM2022-09-22T13:31:58+5:302022-09-22T13:34:39+5:30
NIA Raid On PFI: आज सकाळपासून NIAची PFIवर कारवाई सुरू असून, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सर्वाधिक अटक झाल्या आहेत.
NIA Raid On PFI: राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) आज(गुरुवार) सकाळपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीसह 11 राज्यांमध्ये धाडसत्र सुरू आहे. यादरम्यान, तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PIF) च्या ठिकाणांवर धाडी टाकल्या आणि विविध राज्यातून 106 लोकांना अटक केले आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात सर्वाधिक अटक झाल्या आहेत.
आज सकाळपासून धाड सत्र
106 PFI members arrested in NIA, ED raids across 11 states
— ANI Digital (@ani_digital) September 22, 2022
Read @ANI Story | https://t.co/RuoW1SCRpp#PFI#NIARaid#EDpic.twitter.com/WIP1rheAjt
आज सकाळपासून पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा, अंमलबजावनी संचनालय (ED) आणि राज्य पोलिसांच्या मदतीने छापेमारी सुरू आहे. यादरम्यान, एनआयएने दाखल केलेल्या एका प्रकरणात हैदराबादच्या चंद्रयानगुट्टामधील पीएफआयचे हेड ऑफिस सील करण्यात आले आहे. एनआईय, ईडी आणि पॅरा मिल्ट्री फोर्सने स्थानिक पोलिसांसोबत मिळून हे ऑफिस सील केले आहे.
गृहमंत्र्यांची डोभालांसोबत बैठक
Amit Shah chairs meeting with top officials as NIA raids Popular Front leaders
— ANI Digital (@ani_digital) September 22, 2022
Read @ANI Story | https://t.co/S3SPcvyYXR#AmitShah#PFI#NIApic.twitter.com/IqrUp26e6R
पीएफआयवर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे आणि टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत. पीएफआय संघटनेचे डी कंपनीसोबतही कनेक्शन उघड झाले आहेत. आता एएनआयच्या तपासात महत्वाचे पुरावे मिळू शकतात. यादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल आणि गृह सचिवांसोबत महत्वाची बैठक घेतली.
केरळमध्ये सर्वाधिक अटक
छापेमारीत केरळमधून 22 जणांना अटक करण्यात आले आहे. या पाठोपाठ कर्नाटक आणि महाराष्ट्रातून 20-20 लोकांना ताब्यात घेतलंय. यानंतर, तमिळनाडूत 10 अटक, असामध्ये 9, उत्तर प्रदेशात 8, आंध्र प्रदेशात 5, मध्यप्रदेशात 4, दिल्ली आणि पुड्डुचेरीत प्रत्येकी 3-3 आणि राजस्थानातून 2 जणांना अटक केले आहे.