एनआयएची चार राज्यांत छापेमारी; जिहादी दहशतवादी संघटनेच्या प्रकरणात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:29 PM2023-12-18T12:29:24+5:302023-12-18T12:30:02+5:30
एनआयएने एकट्या कर्नाटकातील १९ ठिकाणी छापे टाकले आहेत.
नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी चार राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. एनआयएचे पथक कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे. जिहादी दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कशी संबंधित प्रकरणात एनआयएचे पथक एकाच वेळी छापे टाकत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने एकट्या कर्नाटकातील १९ ठिकाणी छापे टाकले आहेत. यापूर्वी १३ डिसेंबर रोजी एनआयएने दहशतवादी कट प्रकरणी बंगळुरूमध्ये ६हून अधिक ठिकाणी शोध घेतला होता. दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय असल्याच्या संशयितांच्या ठिकाणी शोधमोहीम सुरूच आहे.
बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या १५ दहशतवाद्यांना ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध भागातून अटक केल्यानंतर शोध सुरू करण्यात आला होता. त्यानंतर एनआयएच्या पथकाने पुणे, मीरा रोड, महाराष्ट्रातील ठाणे आणि कर्नाटकातील बेंगळुरूसह अन्य ४४ ठिकाणी छापे टाकले.