इसिस मोड्यूलप्रकरणी तामिळनाडूत दोन ठिकाणी एनआयएच्या धाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 06:18 AM2019-12-01T06:18:41+5:302019-12-01T06:19:22+5:30

या धाडीत दोन संशयितांच्या ताब्यातून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि एक कु-हाड जप्त करण्यात आली आहे.

NIA raises two issues in Tamil Nadu for Isis module | इसिस मोड्यूलप्रकरणी तामिळनाडूत दोन ठिकाणी एनआयएच्या धाडी

इसिस मोड्यूलप्रकरणी तामिळनाडूत दोन ठिकाणी एनआयएच्या धाडी

Next

चेन्नई : इसिस मोड्यूलप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी तामिळनाडूतील तंजावर आणि तिरुचिरापल्ली येथे धाडी घातल्या. या धाडीत दोन संशयितांच्या ताब्यातून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि एक कुºहाड जप्त करण्यात आली आहे.
इसिसचे मोड्यूल चालविण्याच्या आरोपावरून एनआयएने जूनमध्ये कोईमतूर येथे कारवाई करताना मोहंमद अझरुद्दीन आणि शेख हिदायतुल्ला या दोघांना अटक केली होती. हा तपास पुढे नेण्यासाठी एनआयएने तंजावरमधील अलावुदीन नावाच्या व्यक्तीच्या घरावर, तर तिरुचिरापल्लीमधील एस. सर्फदीन याच्या घरावर धाडी टाकल्या. अलावुदीन आणि सर्फदीन हे अटकेतील दोघांचे सहकारी असल्याचा संशय आहे. या धाडीत दोन लॅपटॉप, सहा मोबाईल फोन, ११ सीम कार्डे, एक पेनड्राईव्ह, एक हार्डडिस्क, एक मेमरी कार्ड, पाच सीडी/डीव्हीडी, एक कुºहाड आणि १७ कागदपत्रे असा ऐवज जप्त केला आहे, असे एनआयएच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तू एर्नाकुलम येथील विशेष एनआयए न्यायालयात सादर केल्या जाणार आहेत. यातील डिजिटल उपकरणांची फोरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे. संशयितांचे अटकेतील आरोपींशी कशा प्रकारे संबंध होते, यासंबंधी चौकशी केली जात आहे. त्यासाठी संशयितांचे जबाब घेतले जात आहेत. त्यांचा आयएसआय अथवा दाईशच्या बेकायदेशीर कृत्यात काही सहभाग आहे का, हे तपासून पाहिले जात आहे.

Web Title: NIA raises two issues in Tamil Nadu for Isis module

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.