एनआयएच्या कारवाईची इसिसने घेतली धास्ती

By Admin | Published: April 21, 2016 10:10 AM2016-04-21T10:10:41+5:302016-04-21T10:10:41+5:30

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जानेवारी महिन्यात केलेल्या कारवाईच्या पार्श्वभुमीवर इसीसने भारतातील दहशतवाद्यांना थोड्या काळासाठी शांत राहण्याचे आदेश दिले आहेत

NIA's action was taken by the opposition | एनआयएच्या कारवाईची इसिसने घेतली धास्ती

एनआयएच्या कारवाईची इसिसने घेतली धास्ती

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २१ - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जानेवारी महिन्यात केलेल्या कारवाईच्या पार्श्वभुमीवर इसीसने भारतातील दहशतवाद्यांना थोड्या काळासाठी शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. इसीसच्या सिरियामधील मुख्य हँण्डरलने हे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. एनआयएने जानेवारी महिन्यात कारवाई करत मुदब्बीर मुश्ताक शेखला अटक करत अनेक राज्यांत केलेल्या कारवाईच्या  पार्श्वभुमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. मुदब्बीर मुश्ताक शेखला एनआयएने जानेवारी महिन्यात मुंब्रा येथून अटक केली होती. मुदब्बीर मुश्ताक शेख (३२) हा 'इसिस'चा भारतामधील मुख्य कमांडिंग अधिकारी होता. अनेक गोरगरीब तरुणांना इसिसच्या जाळ्यात ओढण्याची व त्यांना इसिसपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तो पार पाडत होता.
 
इसीसमध्ये तरुणांना भर्ती करण्याची जबाबदारी शफी अरमार उर्फ युसूफवर आहे. इंटरनेट तसंच सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात असणा-या भारतीयांना शफी अरमारने ऑनलाइन वापर मर्यादित करण्याचे आदेश दिले आहेत. शफी अरमारने भारतातील संपर्कात असणा-या व्यक्तींना भारतात हल्ले करण्यासाठी तरुणांना इसीसच्या जाळ्यात ओढून भर्ती करुन इराक किंवा सिरियामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्याचीही जबाबदारी दिली आहे. 
शफी अरमारने आदेश दिल्यापासून इसीस आणि संपर्कात असणा-या भारतीय तरुणांमधील ऑनलाइन संपर्क कमी झाला असल्याचं गुप्तचर खात्यातील अधिका-याने सांगितलं आहे. जानेवारीमध्ये एनआयएने कारवाई करत जवळपास 24 लोकांना अटक केली होती. यामध्ये इसीसमध्ये भर्ती करण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या सदस्यांचादेखील समावेश होता. महत्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यात शफी अम्मार उर्फ युसुफ हाताळत असलेल्या इसिसच्या १६ ऑपरेटीव्हना अटक करण्यात आली होती ज्यामध्ये मुदब्बीर शेखचादेखील समावेश होता.
 
गेल्या काही महिन्यांपासून इसीसने आपला संपर्क जरी कमी केला असला तरी याचा अर्थ इसीस पुर्णपणे शांत झालं आहे असा नाही असा इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे.इसीसच्या वेबसाईट, सोशल मिडियाला सतत फॉलो करणा-यांवर अधिका-यांची नजर आहे. हे लोक भारत सोडून इसीसमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याची शंका आल्यास लगेच प्रतिबंध करण्यास येईल अशी माहिती भारतीय गुप्तचर खात्यातील सुत्रांनी दिली आहे.
 

Web Title: NIA's action was taken by the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.