खालिस्तान-गँगस्टर्स नेटवर्कवर NIA ची मोठी कारवाई; 7 राज्यांमध्ये छापे, अनेकजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 08:48 PM2023-09-27T20:48:20+5:302023-09-27T20:48:37+5:30

एनआयएने 53 ठिकाणांवर मारलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणा दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

NIA's major crackdown on Khalistan-gangsters network; Raids in 7 states, many detained | खालिस्तान-गँगस्टर्स नेटवर्कवर NIA ची मोठी कारवाई; 7 राज्यांमध्ये छापे, अनेकजण ताब्यात

खालिस्तान-गँगस्टर्स नेटवर्कवर NIA ची मोठी कारवाई; 7 राज्यांमध्ये छापे, अनेकजण ताब्यात

googlenewsNext

NIA Raids: दहशतवादी-कुख्यात गुंड-अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बुधवारी (27 सप्टेंबर) देशातील 7 राज्यांमध्ये छापे टाकले. एनआयएने टाकलेल्या या छाप्यात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सकाळी सुरू झालेल्या या छाप्यात एनआयएने 53 ठिकाणी छापे टाकले, ज्यामध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला.
 
कॅनडातील खलिस्तान समर्थक अर्श डल्ला, लॉरेन्स बिश्नोई आणि सुखा दुनाके यांसारख्या बड्या गुंडांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. घोषित दहशतवादी अर्श डल्ला आणि अनेक कुख्यात गुंडांशी संबंधित दहशतवादी-गुंड-ड्रग तस्कर यांच्या संबंधांवर अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना NIA ने अनेक संशयितांना ताब्यात घेतले.

मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त
पंजाब, दिल्ली, हरियाणा, यूपी, राजस्थान, उत्तराखंड आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड या सहा राज्यांमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये पिस्तूल, दारूगोळा, मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले. या छाप्यांमध्ये अर्श डल्ला व्यतिरिक्त कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई, सुखा दुनाके, हॅरी मौर, नरेंद्र उर्फ ​​लाली, काला जथेरी, दीपक टिनू आदींचा एनआयएच्या तपासाच्या कक्षेत समावेश होता.
 
सातव्यांदा छापा टाकला
एनआयएने ऑगस्ट 2022 मध्ये 5 एफआयआर नोंदवले होते. या एफआयआरनुसार एनआयएने छापे टाकण्याची ही सातवी वेळ आहे. याशिवाय या वर्षी जुलैमध्ये दोन एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या, ज्यानुसार छापे टाकण्यात आले होते. ही प्रकरणे टार्गेट किलिंग, खलिस्तान समर्थकांना दहशतवादी फंडिंग, खंडणी आदींशी संबंधित आहेत. या प्रकरणांमध्ये नाव असलेले अनेक गुंड आणि दहशतवादी विविध तुरुंगात कैद आहेत किंवा पाकिस्तान, कॅनडा, मलेशिया, पोर्तुगाल आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये भारताविरुद्ध कट रचत आहेत.
 
पाकिस्तानशिवाय या देशांतून नेटवर्क सुरू 
दहशतवादी-गुंड-ड्रग स्मगलर यांच्यातील संबंध उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने आजचे छापे विविध खलिस्तानी संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी संबंधित शस्त्र पुरवठादार, वित्तपुरवठादार आणि रसद पुरवणाऱ्यांवर केंद्रित होते. या टोळ्या पाकिस्तान, यूएई, कॅनडा, पोर्तुगाल आणि इतर देशांतील ड्रग्ज तस्कर आणि दहशतवाद्यांच्या सहकार्याने काम करत आहेत. देशातील विविध राज्यांच्या तुरुंगात बसून ते संघटित पद्धतीने भारताविरुद्ध कट रचत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. 

Web Title: NIA's major crackdown on Khalistan-gangsters network; Raids in 7 states, many detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.