NIA Raid: दहशतवादी आणि गुंडांविरुद्ध एनआयएची कारवाई, ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2023 09:26 AM2023-05-17T09:26:46+5:302023-05-17T09:27:30+5:30

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ६ राज्यांमध्ये १०० ठिकाणी छापे टाकले आहेत.

nias major crackdown on terrorist drug smugglers network raids continue at more than 100 places | NIA Raid: दहशतवादी आणि गुंडांविरुद्ध एनआयएची कारवाई, ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

NIA Raid: दहशतवादी आणि गुंडांविरुद्ध एनआयएची कारवाई, ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

googlenewsNext

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देशभरातील गुंड-दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी मोठी कारवाई करत आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) दहशतवाद-अमली पदार्थांचे तस्कर-गँगस्टरच्या संबंधात देशभरात १०० ठिकाणी छापे टाकत आहे.

सध्या उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात छापेमारी सुरू आहे. एनआयए या राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकत आहे. पंजाबमधील मोगा व्यतिरिक्त एनआयएचे पथक निहाल सिंग वाला तलवंडी भांगेरिया येथेही पोहोचले आहे.

समीर वानखेडेंवरील FIR नंतर, नवाब मलिकांना आलेल्या अज्ञात पत्राची चर्चा, कोणी पाठवलेले?

एनआयएने राज्य पोलिस दलांसह, बुधवार पहाटेपासून संशयितांशी संबंधित परिसर आणि इतर ठिकाणांवर छापे टाकले. छापा अजूनही सुरूच आहे. गेल्या वर्षी NIA द्वारे नोंदवलेल्या RC 37, 38, 39/2022/NIA/DLI या तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या संदर्भात छापे टाकले जात आहेत.

मे २०२२ मध्ये मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर झालेल्या RPG हल्ल्यातील संशयित दीपक रंगा याला या वर्षी २५ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून अटक करण्यात आली होती. तो कॅनडास्थित गँगस्टर-दहशतवादी लखबीर सिंग संधू ऊर्फ लंडा आणि पाकिस्तानस्थित गँगस्टर-दहशतवादी हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा यांचा जवळचा सहकारी होता.

आरपीजी हल्ल्यात त्याच्या सहभागाव्यतिरिक्त, दीपक इतर अनेक हिंसक दहशतवादी आणि गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सामील आहे, ज्यात खुनाचा समावेश आहे. तो रिंडा आणि लांडा यांच्याकडून सक्रियपणे दहशतवादी निधी मिळवत होता.

Web Title: nias major crackdown on terrorist drug smugglers network raids continue at more than 100 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.