निफाडला स्वातंत्र्यदिन साजरा

By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:16+5:302015-08-18T21:37:16+5:30

निफाड इंग्लीश स्कुल : येथील निफाड इंग्लिश स्कूल येथे दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल कमीटीचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष नंदलाल चोरडिया, संजय कुंदे, प्रवीण कराड, प.ल. कराड, यादवदादा वडघुले, मुख्याध्यापक अ.ना.वाघ, पर्यवेक्षक टाकळकर उपस्थित होते.

Nifadala celebrates Independence Day | निफाडला स्वातंत्र्यदिन साजरा

निफाडला स्वातंत्र्यदिन साजरा

Next
फाड इंग्लीश स्कुल : येथील निफाड इंग्लिश स्कूल येथे दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल कमीटीचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष नंदलाल चोरडिया, संजय कुंदे, प्रवीण कराड, प.ल. कराड, यादवदादा वडघुले, मुख्याध्यापक अ.ना.वाघ, पर्यवेक्षक टाकळकर उपस्थित होते.
निफाड नागरी पतसंस्था
निफाड नागरी सह. ग्रामीण पतसंस्था येथे या पतसंस्थेचे संचालक शशांक सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी या पतसंस्थेने अध्यक्ष प्रकाश सुराणा, उपाध्यक्ष कांतीलाल कायस्थ यांच्यासह संचालक मंडळ, व्यवस्थापक रामनाथ सानप आदि उपस्थित होते.
निफाड अर्बन बँक
निफाड अर्बन बँक येथे बँकेचे संचालक आनंद दायमा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र राठी, उपाध्यक्ष प्रवीण कराड, संचालक मंडळ, माजी सरपंच अनिल कुंदे, व्यवस्थापक मोहन सुराणा आदि उपस्थित होते.
काँग्रेस भवन
निफाड तालुका काँग्रेस कमीटीच्यावतीने काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे प्रभारी तालुकाध्यक्ष प्रकाश अडसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मधुकर शेलार, शिवाजी ढेपले, पुंजाआप्पा तासकर, मधुसुदन आव्हाड, प्रवीण तनपुरे आदि उपस्थित होते.
श्री माणकेश्वर वाचनालय
श्री माणकेश्वर वाचनालय येथे वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी चिटणीस दत्ता उगांवकर, बाळासाहेब कापसे, तनवीर राजे, सिताराम गायकवाड, सौ. सुजाता तनपुरे, बाळासाहेब खालकर आदि उपस्थित होते.
सरस्वती विद्यालय
सरस्वती विद्यालयात सविता गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष नंदलाल चोरडिया, निफाड अर्बन बँकेचे उपाध्यक्ष प्रवीण कराड, राजेंद्र चांडक, नारायण कर्डीले, मुख्याध्यापिका सौ. जयश्री सौदांणकर आदि उपस्थित होते.
कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात प्राचार्य पी. व्ही. रसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे भाग्यश्री पतसंस्थेत पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
योगेश्वर विद्यालय दावचवाडी येथे न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त प्रभाकर कुयटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त रतन पाटील वडघुले, किरणभाऊ कापसे, मुख्याध्यापक सी.एस. वाघ आदि उपस्थित होते.

Web Title: Nifadala celebrates Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.