गोव्याच्या पर्यटनास नायजेरियनांचा ताप
By admin | Published: June 2, 2016 03:01 AM2016-06-02T03:01:47+5:302016-06-02T03:01:47+5:30
गोव्याच्या पर्यटन व्यवसायाची व्याप्ती वाढत असतानाच नायजेरियनांसारखे विदेशी पर्यटक गोव्याला अत्यंत तापदायी ठरत असल्याची चिंता गोवा सरकारने व्यक्त केली आहे.
सद्गुरू पाटील, पणजी
गोव्याच्या पर्यटन व्यवसायाची व्याप्ती वाढत असतानाच नायजेरियनांसारखे विदेशी पर्यटक गोव्याला अत्यंत तापदायी ठरत असल्याची चिंता गोवा सरकारने व्यक्त केली आहे. नायजेरियनांच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणण्याचा विचारही गोवा सरकारने चालविला आहे.
उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या विविध भागांमध्ये अनेक नायजेरियन रेस्टॉरंट, पब, शॅक चालविणे अशा प्रकारचे धंदे करतात. पर्यटक टॅक्सी चालविण्याच्याही व्यवसायात ते उतरते आहेत. यामुळे स्थानिक गोमंतकीय लोक नायजेरियनांवर खूप नाराज झाले आहेत. पर्यटक बनून येणारे नायजेरियन व्हिसा संपला तरी, गोव्यातच कायम राहतात. ते गोव्यात आल्यानंतर मग स्वत:कडील पासपोर्ट जाळून टाकतात. त्यामुळे त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठविण्यामागे
तांत्रिक अडचणी येतात, असा
अनुभव पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितला.
आपल्या व्यवसायाची सूत्रे नायजेरियनांच्या हाती जाऊ लागल्याने गोमंतकीयांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन करून गोव्यात जमिनी, फ्लॅट यासारख्या मालमत्ता विदेशी व्यक्ती खरेदी करत असून, त्यात नायजेरियनांचे प्रमाण जास्त आहे, अशीही माहिती मिळते. फेमा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी केंद्र सरकारची यंत्रणा गोव्यातील अनेक विदेशी नागरकिांची सध्या चौकशी करत आहे.
दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यातील कळंगुट, हरमल, मोरजी, कांदोळी, अंजुणा, पर्रा या पट्ट्यात नायजेरियनांचे वास्तव्य अधिक आहे. हजारो नायजेरियन गोव्याच्या किनारपट्टीत स्थायिक झाले असून, स्थानिक संस्कृती व लोकपरंरांच्या दृष्टीनेही ते चिंतेचे बनले आहे. दोन वर्षांपूर्वी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना नायजेरियनांनी पर्रा येथे स्थानिकांशी मोठे भांडण केले होते. त्यानंतर पणजी- म्हापसा या राष्ट्रीय महामार्गावरील पर्र्वरी येथे येऊन महामार्गावरील वाहतूक ६० नायजेरियनांनी रोखून धरली होती. त्यावेळी पोलिस बळही त्यांना अडविण्यात कमी पडले होते. उत्तर गोव्यात कुठेही एखाद्या नायजेरियनास स्थानिकाने त्रास दिला तर सगळे नायजेरियन संघटीत होतात आणि मग त्यांच्याकडून स्थानिकांना लक्ष्य बनविले जाते.दोन दिवसांपूर्वी गोव्यातील एका महिलेवर नायजेरियन नागरिकाने बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर पुन्हा गोमंतकीय विरुद्ध नायजेरियन असा वाद चर्चेस आला आहे. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी गोव्यातील नायजेरियनांच्या वर्तनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. गुन्ह्यांमध्ये सापडणाऱ्या नायजेरियनांना काळ््या यादीत टाकण्याची गरज आहे. विद्यार्थी बनून हे नायजेरियन गोव्यात येतात आणि अमली पदार्थांचाही धंदा करतात, असे परुळेकर म्हणाले.नायजेरियन लोकांच्या वेगळ्या वर्तणुकीमुळे स्थानिक लोक संतापतात, असा खुलासा गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी केल्यामुळे वादात भर पडली आहे. आफ्रिकन वंशांच्या नागरिकांवर भारतात झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सारवासारव चालविली असताना पार्सेकर यांचे विधान टीकेचे कारण ठरले आहे.
अन्य विदेशी नागरिकांवर लोक चिडत नाहीत. नायजेरियन लोकांची वागणूक वेगळीच असते, असे पार्सेकर म्हणाले. गोव्यात नायजेरियन महिलेवर झालेला बलात्कार आणि दिल्लीतील वांशिक हल्ल्यांच्या आरोपांबाबत ते एका प्रश्नाला उत्तर देत होते.