"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:39 PM2020-07-02T13:39:20+5:302020-07-02T13:47:06+5:30
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. भारताच्या या निर्णयाचं संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं" असं म्हणत निक्की हेली यांनी निर्णयाचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. "चीनसाठी मोठी बाजारपेठ असणाऱ्या भारताने टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर बंदी घातलेला निर्णय पाहून चांगलं वाटलं. भारत चीनला सातत्याने तुमच्या आक्रमकतेसमोर आम्ही झुकणार नाही हे दाखवून देत आहे" असं निक्की हेली यांनी म्हटलं आहे.
Good to see India ban 59 popular apps owned by Chinese firms, including TikTok, which counts India as one of its largest markets. India is continuing to show it won’t back down from China’s aggression. https://t.co/vf3i3CmS0d
— Nikki Haley (@NikkiHaley) July 1, 2020
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनीही भारताच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. भारताने देशात 59 चायना अॅपवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेने भारत सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या निर्णयाचे समर्थन करताना, भारताने देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे पाऊल उचलले असून या निर्णयामुळे भारताच्या एकता आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळेल, असे पॉम्पिओ यांनी म्हटलंय. चीनच्या कम्युनिष्ट पक्षाची क्रुरता जगभरात परिणाम करते, त्यामुळेच सर्विलांस स्टेटचा धोका ओळखूनच भारताने चीनी अॅपवर बंदी घातलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत, असंही अमेरिकेने म्हटलं आहे.
भारत सरकारने केलेल्या या कारवाईबाबत चीनच्या पररष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितलं की, भारत सरकारने केलेल्या कारवाईमुळे चीन खूप चिंतीत आहे. आम्ही या परिस्थितीला दुजोरा देत आहोत. या संदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करून दिली. चिनी व्यावसायिकांनी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कायद्यांचे, नियमांचे पालन करावे, असा चीन सरकारचा आग्रह असतो. आता चिनी गुंतवणूकदारांसह आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे कायदेशीर हक्क कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीय सरकारची आहे, असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! रुग्णसंख्येची चिंता वाढवणारी आकडेवारीhttps://t.co/icERVUjOup#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 2, 2020
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! देशातील रुग्णांची संख्या तब्बल ६ लाखांवरhttps://t.co/q9IaXIIol7#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 50 जणांचा मृत्यू
CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका
Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च
CoronaVirus News : धोका वाढला! ५ दिवसांत १ लाख नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ