चिंता वाढली! पुढील ९ वर्षांत ९ मोठी शहरं बुडणार; कोट्यवधी लोकांची झोप उडवणारा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 09:43 AM2021-11-05T09:43:14+5:302021-11-05T09:43:35+5:30

समुद्राच्या किनारी वसलेल्या शहरांसाठी धोक्याची घंटा; कोट्यवधींचा जीव टांगणीला

nine cities including kolkata could be underwater by 2030 | चिंता वाढली! पुढील ९ वर्षांत ९ मोठी शहरं बुडणार; कोट्यवधी लोकांची झोप उडवणारा अहवाल

चिंता वाढली! पुढील ९ वर्षांत ९ मोठी शहरं बुडणार; कोट्यवधी लोकांची झोप उडवणारा अहवाल

Next

जागतिक तापमानवाढीचं संकट दिवसागणिक गहिरं होत चाललं आहे. जगातील अनेक शहरं २१०० पर्यंत पाण्याखाली जाणार आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळू लागला आहे. हिमकडे कोसळून समुद्रातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर वसलेल्या शहरांना मोठा निर्माण झाला आहे. क्लायमेट सेंट्रल नावाच्या प्रकल्पाअंतर्गत जागतिक तापमान वाढीसंदर्भात एक अहवाल तयार करण्यात आला आहे.

जागतिक तापमानवाढीचा वेग आणि त्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यांचा विचार करून अहवाल तयार करण्यात आला. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना असेल याची यादी अहवालात आहे. त्यानुसार पुढील ९ वर्षांत ९ मोठी शहरं पाण्याखाली जातील. या यादीत भारतामधील कोलकात्याचा समावेश आहे.

पश्चिम बंगालची राजधानी असलेलं कोलकाता शहर २०३० पर्यंत पाण्याखाली जाऊ शकतं. मान्सूनचा पाऊस आणि भरती यामुळे कोलकात्यात अनेकदा पूर परिस्थिती निर्माण होते. संपूर्ण शहरात पाणी साचतं. पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच होत नाही. त्यामुळे कोलकात्याला मोठा धोका आहे. याशिवाय समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं दुहेरी संकट आहे.

कोणत्या शहरांना तापमानवाढीचा धोका?
१. ऍमस्टरडॅम, नेदरलँड
२. बसरा, इराक
३. न्यू ओरलींस, अमेरिका
४. वेनिस, इटली
५. हो ची मिन्ह, व्हिएतनाम
६. कोलकाता, भारत
७. बँकॉक, थायलंड
८. जॉर्जटाऊन, गयाना
९. सवाना, अमेरिका

Web Title: nine cities including kolkata could be underwater by 2030

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.