तेलंगणात जलविद्युत प्रकल्पाला आग, नऊ जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:46 AM2020-08-22T06:46:04+5:302020-08-22T06:46:13+5:30
त्यातील 21 जणांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणाची आता सीआयडीकडून चौकशी होणार आहे.
तेलंगणात जलविद्युत प्रकल्पाला लागलेल्या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तेलंगणामधील श्रीशैलम येथील जलविद्युत प्रकल्पात गुरुवारी रात्री आगीत अनेक जण अडकले. या प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या जलविद्युत प्रकल्पातील एका बोगद्यामध्ये आग लागली त्यावेळी तिथे
30 कर्मचारी होते. आग व धुरामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यातील 21 जणांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणाची आता सीआयडीकडून चौकशी होणार आहे.
03 जणांचीच ओळख पटू शकली. सुंदर नायक, फातिमा, मोहनकुमार अशी नावे आहेत. तेलंगणा पोलिसांतील सीआयडी विभागाचे अतिरिक्त संचालक गोविंदसिंह चौकशी करणार आहेत. अहवाल लवकर सादर करण्याचे राज्य सरकारकडून आदेश देण्यात आले आहेत. 06 जणांची सुटका करण्यात आली. 15 जणांनी या प्रकल्पाच्या आपत्कालीन मार्गाने बाहेर पडून जीव वाचविला.
>दोन राज्यांचा संयुक्त जलविद्युतनिर्मिती प्रकल्प
श्रीशैलम येथील जलविद्युतनिर्मिती प्रकल्प हा कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणाच्या शेजारी आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेश सरकारचा हा संयुक्त प्रकल्प आहे. नलामल्ला वनक्षेत्रामध्ये एका प्रचंड बोगद्यात हा जलविद्युतनिर्मिती प्रकल्प बांधण्यात आला आहे. सध्या प्रचंड पावसामुळे अतिरिक्त जलसाठ्याचा विसर्ग करण्यासाठी या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.