पंढरपुरात व्हॉट्सॲपच्या चार ॲडमिनसह नऊ जणांना अटक अफवा पसरविणार्‍यांना चपराक : दरोडेखोर घुसल्याचे केले मेसेज फॉरवर्ड

By admin | Published: August 11, 2015 12:03 AM2015-08-11T00:03:37+5:302015-08-11T00:03:37+5:30

पंढरपूर : गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून गावची गावे वेठीस धरणार्‍या व्हॉट्सॲपच्या चार गु्रप ॲडमिनसह नऊ जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री १० वाजता अटक केली़

Nine people arrested in Pandharpur, including four officers of Votersap, have been arrested for spreading rumors: message forwarded by the robber | पंढरपुरात व्हॉट्सॲपच्या चार ॲडमिनसह नऊ जणांना अटक अफवा पसरविणार्‍यांना चपराक : दरोडेखोर घुसल्याचे केले मेसेज फॉरवर्ड

पंढरपुरात व्हॉट्सॲपच्या चार ॲडमिनसह नऊ जणांना अटक अफवा पसरविणार्‍यांना चपराक : दरोडेखोर घुसल्याचे केले मेसेज फॉरवर्ड

Next
ढरपूर : गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून गावची गावे वेठीस धरणार्‍या व्हॉट्सॲपच्या चार गु्रप ॲडमिनसह नऊ जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री १० वाजता अटक केली़
सोलापूर जिल्‘ात गेल्या १५ दिवसांपासून चोर, दरोडेखोर घुसल्याची जोरदार चर्चा गावागावांत होत आहे़ त्या भीतीने ग्रामीण भागातील नागरिक अख्खी रात्र जागून काढत आहेत़ व्हॉट्सॲपद्वारे फॉरवर्ड होणार्‍या संदेशामुळे या अफवा वेगाने पसरल्या़
पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या तालुक्यात चोरट्यांच्या अफवा पसरवत काल्पनिक फोटोही अपलोड करून व्हायरल करण्याचे काम जोरात सुरू होते. यामुळे नागरिक प्रचंड तणावाखाली आहेत़ त्याबरोबरच आपल्या सुरक्षेसाठी मुलाबाळांसह ते अक्षरश: रात्र जागून काढत आहेत. दरम्यान पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना आदेश देऊन अफवा पसरविणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पंढरपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात येत असल्याने सोमवारी रात्री अशा अफवेखोर ॲडमिनच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यात विविध भागातील नऊ जणांचा समावेश आहे. ही कारवाई पो. नि. दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. (प्रतिनिधी)
---------------
हे आहेत ग्रुप
पंढरपूर परिसरातील विठ्ठल मंदिर परिसर, फ्रेंडशिप फॉरेवर, छत्रपती, मैत्री या व्हॉट्सॲप ग्रुपचे प्रत्येकी एक ॲडमिन अशा चार तर ग्रुपमधील पाच सदस्य अशा नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मैत्री ग्रुपद्वारे अफवा पसरविणारा सदस्य पंढरपुरातील असला तरी तो सध्या केरळमध्ये फिरायला गेला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
----
दिवसभर ५0 मोबाईलची तपासणी
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. दयानंद गावडे यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन नागरिकांना अफवा पसरवू नका, असे आवाहन करीत आहेत. सोमवारी सायंकाळी अनवली येथे याबाबत बैठक घेण्यात आली. दरम्यान एका तरूणाच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याच्याच मोबाईलवर तीन ग्रुप सापडले. त्याच आधारे तपास केला असता आणखी एक ग्रुप आढळला. दिवसभर ५0 मोबाईलची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Nine people arrested in Pandharpur, including four officers of Votersap, have been arrested for spreading rumors: message forwarded by the robber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.